सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

पंचशिलनगर मधील कामे

मंडळी जयभिम

काल दि २६ डिसेंबर रोजी आपल्या पंचशिलनगर मध्ये आपले लाडके नेते कार्यसम्राट माजी आमदार मा.सत्यजित पाटील उर्फ आबा यांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मिटींग घेतली.त्यांनी प्रलंबित कामांच्या पुर्ततेसाठी आश्वासन दिले.नियोजीत कामांची वेगाने पुर्तता करण्याचे आदेश देखील ग्रा.पं.सदस्यांना दिले.आबांच्या या कार्यांचे मी स्वागत करतो अभिनंदन करतो व धन्यवाद देतो.तसेच या कामी आबांच्या पर्यंत आपला आवाज पोहचवण्याचे काम माझे मित्र व ग्रा.पं सदस्य रामदासजी व्हावळे यांनी केलं त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद.त्यांच्या नुतन पंचवार्षिक कालावधीसाठी मी त्यांना मनापासून सुयश चिंततो व त्यांना सरुड चे उपसरपंच पद मिळो अशी इच्छा प्रकट करतो.वास्तविक रामभाऊ आणी आमच्या मध्ये खास नातं आहे.आम्ही एकत्र खेळलो वाढलो.आमच्यात गाढ मैत्री आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा!!!

तथापी गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात रस्त्यापलीकडच्या लोकवस्तीमध्ये कामं झालेली नसल्यामुळे मी स्व: त खुप व्यथीत होतो.आता ती कामे मार्गी लागत असल्याने समाधान वाटत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मी स्वंत: अनेक शोधमोहीमा घेतल्या.किती कुठे फंड आणला गेला वैगेरे बाबत.त्याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या कडे मी माहीतीचा अधिकार २००५ अधिनियम ३ अन्वये दोन अर्ज दाखल केलेले आहेत.त्याबाबत उचीत ती प्रक्रिया जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर चालू असेल व ती ग्रामपंचायती कडे सुध्दा येऊ शकेल.मला कदाचित या बद्दलची माहीती पुढील १५ तिन आठवड्यामध्ये मिळून जाईल.उपलब्ध होणार्या माहीतीचा कुठलाही दुरूपयोग करण्याची माझी मानसिकता नाही कारण आता नेते मंडळींनीच काम करण्याचे आश्वासन दिले आहे.तरी माझ्या या अर्जाला दुर्लक्षित करावे.आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारचे संशयाचे मळभ राहू नये या साठी मी याची सविस्तर माहीती दिली.आपण निःसंशय पणे विकास कामे पुर्ण करावीत.

तसेच आपल्या स्मशानभूमी जमीनीचे सपाटीकरण करण्यात येऊन तिथे पेविंग ब्लॉक्स घालण्यात यावे.समाज कल्याण जि.प. मार्फत वाचनालय व व्यायाम शाळा मागासवर्गीय वस्तीसाठी फंड मिळतो त्या संबधी योग्य ति कार्यवाही करावी.रस्त्याकडील वस्ती मध्ये गटर्स व लाईट ची सोय करावी.असे मी आवाहन करतो.मला आशा आहे या संबधी योग्य ती कार्यवाही होईल.


धन्यवाद!!!

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

पंचशिलनगर विकास मंच

मंडळी जयभिम

आज मी पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधतोय.विषय तसा महत्वाचा आहे अर्थात सध्यातरी तो माझ्यासाठी महत्वाचा आहे आशा करतो की हे वाचल्यानंतर तो आपल्यासाठी सुध्दा महत्वाचा होईल.पुन्हा एकदा नवीन whats app पोस्ट अस म्हणून आपण दुर्लक्ष करणार असाल तर ही बाकीच्या पोस्ट प्रमाणे ही पोस्ट unnoticed च होईल.मी भलां, माझ काम भलं, माझ कुटुंब भलं अशा मानसिकतेत आपल्यापैकी खुप जण आहेत.त्या विचाराने मनस्वास्थ्य जरूर लाभत असेल परंतू समाजाचं काय? हा प्रश्न मात्र निरूत्तरीत राहतोच.

समाजाच्या आयचा घो,समाज गेला खड्ड्यात. समाज कुठ शहाणा आहे असे बोलणारे अनेक नव विचारवंताचा सुळसुळाट आपल्याकडे झाला आहे.त्यांच्या या विचारामुळेच प्रत्यक्ष रणभूमीत कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रुतल्यासारख झालं आहे.आपल्याला तर बाबासाहेबांनी आवाहन केलय प्रगतीचा रथ पुढे नेण्याचं.नाही जमल तर रथ आहे तिथे तरी असू द्या परंतू हा रथ माघारी नेण नतद्रष्ट पणा असेल.आणी म्हणून आपणा सगळ्यांना आता कात टाकायला लागेल.जागे व्हायला लागेल.संपुर्ण देशच आता गोंधळाच्या स्थितीत आहे.आपणाकडे मात्र बाबासाहेबांचा विचार आहे.बाबासाहेबांसारखा पहाडी माणूस आपलं नैत्रूत्व करायला नसला तरी आपल्या प्रत्येकात बाबासाहेब आहेत.आपल्याला पुढे यायचं आहे.जाग्रूत व्हायच आहे.प्रत्येक गावातल्या प्रत्येक समाजाने डोळस पणे वागलं तर समाजाची प्रगती होईल.आपण झोपलो तर त्यांचे फावणार आहे.आपलं गप्प बसण्यामुळे त्यांच साधणार आहे.

आपल्या समाजापुढे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहत आहेत.नोकर्यांचा प्रश्न जटील होणार आहे.नोकर्या तर सर्वांना मिळणार नाहीत म्हणून व्यवसायाची कास धरायला लागणार आहे.सरकारच्या अनेक योजना आहेत त्यांचा लाभ घेता येतो का बघून आपल्याला या कठीण परिस्थितीत तरायच आहे.खुप सार्या योजना आहेत मात्र त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.पोहचवल्या जात नाहीत.ज्यांना माहीत असतं ते सांगत नाहीत.ज्याना माहीत होतात ते नेत्यांचे बगलबच्चे असतात. 

जिल्हा परिषद समाज कल्याण च्या दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत योजना, मागासवर्गीय व्यक्तींसाठींच्या योजना,14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या योजना अशा भरमसाट योजनेंचा पैसा येत असतो त्याच काय होतं याचा जाब विचारायला हवा.त्यासाठी माहीती घ्यावी लागेल.अनियमितता कुठे होतीय का तिकडे लक्ष ठेवावं लागेल.माझ्या समाजाला येणारा पैसा माझ्या समाजालाच मिळाला पाहीजे तो चार दोन बेरक्या लोकांच्या घशात जाता कामा नये या साठी जाग्रूत रहावं लागेल.

मी हे का करावं?मी समाजासाठी स्वतः च डोक का फोडून घ्यावं? असा आपल्या मनात प्रश्न आला असेल तर आठवा बाबासाहेबांना.स्वत: पुरत बघून बाबासाहेब मोठे श्रिमंत झाले असते परंतु बाबासाहेबांनी ज्ञान झोपडपट्टीपर्यंत नेल.झोपड्यात सुध्दा प्रकाशाचा कवडसा निर्माण झाला.म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी जाग्रूत व्हायला पाहीजे.समाजासाठी फारस काय करता आलं नाही तरी चालेल परंतू माझ्या समाजाला येणारा फंड जातो कुठ म्हणायला हवं.तो जर भलतीकडे जात असेल.तर तुकोबांच तत्व ध्यानात घ्यायला हवं. 
भले तरी देवू कासेची लंगोटी|नाठाळाच्या माथी हाणू काठी| 

मि माझ्या पुढील वाटचालीसाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे.पंचशिलनगरचा विकास हे माझं तत्वज्ञान आहे.विकास करता आला नाही तर निदान भकास होवू नये याचा ध्यास मी बाळगणार आहे.बदनामी,नालस्ती किंवा म्रृत्यूची तमा मी बाळगणार नाही.मी माझ्या समाजाला न्याय देण्याचा विचार कवटाळत आहे.मि आपणा सर्वांनाच आवाहन करतो आपणही माझ्या सोबत असा.पंचशिलनगर नागरिक संघ हे नाव बदलून पंचशिलनगर विकास मंच हे नाव आपल्या whats group ला दिलं जाईल.ज्यांना माझी कल्पना हास्यास्पद वाटेल,चुकीची वाटत असेल त्यांना मी आवाहन करत़ो आपण या ग्रुपमधून बाहेर पडु शकता.ज्याना माझ्यासोबत काम करायच आहे त्यांनी आपली मते या ग्रुपवर वेळोवेळी शेअर करत जा.जे जे आपली मते आपले विचार व्यक्त करणार नाही ते ते ग्रुपचा उद्देश्य स्विकारत नाहीत अस मानलं जाईल.

आपला हेमंत तेलवेकर....
२५ डिसेंबर २०२२
9890869098

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

एका मतदाराच्या नजरेतून..

मंडळी..


सध्या ग्रामपंचायत निवडणूक चे वारे जोरदार चालू आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी ग्राम स्तरावर लोकांचा सहभाग असण्यासाठी या निवडणुकांची उपयुक्तता खुपच महत्वाची असते.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कमालीची चुरस आपल्याला बघायला मिळते.एक एक मत  महत्वाचे मानले जाते.सरूड सारख्या ग्रामपंचायती वर  एकाच गटाचे तब्बल पन्नास वर्ष वर्चस्व राहीलेले आपल्याला बघायला मिळते.इतक्या वर्षाचे वर्चस्व अर्थातच चांगल्या कामाची पोचपावती असते.सगळे काही आलबेल असताना सुध्दा काही बाबतीत कामांची आवश्यकता आहे, काही कामांची पुर्तता होणे गरजेचे आहे अस माझ्या सारख्या मतदाराला वाटते.खर तर ज्या बाबतीत काम होणे गरजेचे आहे त्या विषयांचा समावेश कुठल्याच पार्टिच्या किंवा गटाच्या अजेंडा वर नसतो.आणी म्हणूनच मला ग्रामस्तरावर जी कामे होणे आवश्यक वाटतं ती मी पुढे शब्दबद्ध करत आहे.सत्तेवर येणारे पॅनेल ही कामे पुढे रेटतील अशी मला आशा वाटते.किंबहुना पुढे जाऊन काम करण्यासाठी त्यांना यांचे नियोजन करता येण सोपं जाईल अस मला वाटतं.ती कामे पुढीलप्रमाणे...

1. वॉर्ड क्र. १ मध्ये हरीजनवाड्याचा समावेश आहे.येथील लोकांची मागणी आहे या हरीजनवाड्याचे सर्व सरकारदप्तरी नाव बदलून ते पंचशिलनगर व्हावे.

2. दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत व वैयक्तीक लाभाच्या योजनांबद्दल नागरिकांना पुरेशी माहीती नसते.नागरिकांना ही माहीती मिळावी यासाठी महीन्यातून किमान एकदा नागरिकांचा उद्बोधन वर्ग घ्यावा.

3.वैयक्तिक योजनांचा लाभ खुपदा तेच तेच घेत असतात.अशा लाभार्थ्यां शिवाय ज्यांना कधीच लाभ मिळाला नाही किंवा योजनेस पात्र आहेत अशांना लाभ मिळण्याची व्यवस्था पारदर्शक रित्या व्हावी.

4.घरफाळा भरला नाही किंवा पाणीपट्टी भरली नाही म्हणुन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कामासाठी लागणारे दाखले अडवून ठेवले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले जावे.

5.दरवर्षी कोणत्या योजनेसाठी किती रक्कम खर्च केली गेली याची प्रसिध्दी केली जावी.विशेषतः दलित वस्ती वर खर्ची करण्यात येणारी रक्कम

6.गावामध्ये असणार्या प्राथमिक,माध्यमिक शाळांचा गुणवत्ता व दर्जा उत्तम असण्यासाठी विशेष बाब म्हणून सरंपचानी प्रत्येक महीन्यातून  एकदा शाळांचे जेष्ठ शिक्षक व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक घ्यावी.

7.सरूड गावामध्ये प्रक्टिस करणारे डॉक्टर्संनी आपले दवाखाने सरुडकर नागरिकांसाठी आहेत हे भान ठेवून सदैव गावात उपस्थित रहावे व बाहेर गावी असणार्या त्यांच्या ओपीडीज बंद कराव्यात जेणे करून गावातील रुग्णाची अजीबात आबाळ होणार नाही याची दक्षता सरपंच व नुतन सदस्यांनी घ्यावी.

8.सरकारी दवाखान्यातील कर्मचारी कामचुकार पणा करणार नाहीत व ते आपल्या ड्युटीवर नियमीत हजर राहतील याकडे लक्ष देणे.तसेच गावासाठी जादा कर्मचार्यांची मागणी करणे.

9. सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीयांना सुध्दा दवाखान्याचा खर्च परवडत नाही हे बघता गावातील डॉक्टर असोशियशन बरोबर बैठक घेऊन दवाखान्याचे चार्जेस पन्नास टक्क्याने कमी होतील असा प्रयत्न करणे.

10.गावातील नळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे व वैयक्तीक मालकिच्या नळाच्या पाण्याचा उपव्यय होत नाही याची खात्री करणे.

11.गावातील वाचनालयाचा दर्जा सुधारणे.नवीन पुस्तके खरेदी करणे. तसेच वाचनालयास स्वतंत्र इमारतीसाठी प्रयत्न करणे.

12. बलोपासनेचे महत्व व कुस्ती प्रेमींसाठी तालिम अद्ययावत करणे.

13.खेळामध्ये गावची मुले प्रगतीपथावर राहण्यासाठी शाळांमधून खेळांचे मार्गदर्शन योग्यरित्या होतं का यावर लक्ष ठेवणे.

14.ग्रामस्तरावर विवीध क्षेत्रामधील यशस्वितांचा गौरव करणे. त्यासाठी ग्रामपंचायती मार्फत सरुड -रत्न पुरस्काराची स्थापना करणे व दरवर्षी त्याचे वितरण करणे..



एक मतदार म्हणून माझ्या गावात वरील गोष्टी व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. काही गोष्टि अर्थात अवाजवी असू शकतील.व्यक्ती परत्वे त्या वेगळ्या सुध्दा असू शकतील...

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

अरण्यरूदन

भारतीय दलीत महासंंघाने आयु.श्रीकांत कांबळे (आप्पा) यांच्या नैतृत्वाखाली काल सरुड मध्ये जन आंदोलन केले आणी हाथरस पिडीतेला न्याय मिळावा याची मागणी केली.उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ ज्यांना योगी समजल जात पण ते भोगी आहेत त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध केला याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो.आप्पा यांच्या बरोबर महाविद्यालयीन जिवनात आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो त्यावेळी ते आमचे कँप्टन होते.आज तर ते महासंघाचे नैतृत्व समर्थपणे करताहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे.खुपदा ते मला बोलले होते की बुध्दीजिंवींनी लेखणी चालवायला पाहीजे.आमची लेखणी तशी काय चालली नाही परंतु आप्पांनी मात्र आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर चळवळ जोरदार चालवली आहे. गेल्या पंधरा दिवसात शेतकरी हिताच्या आड येणार्या विधेयका विरोधातील आदोलन आणी हाथरस च्या अमानवी बलात्कार आणी हत्यांकांडाचा निषेध आदोलन मधुन पददलीत समाजाची एकी आपण दर्शविली आहे.

गेल्या दहा बारा दिवसात दोन घटना अशा घडल्या आहेत की ज्या मुळे अस वाटावं की या देशातील दलीत व मुस्लीम असुरक्षीत आहेत. बाबरी मस्जिद पाडाव प्रकरणी ३०सप्टेंबर ला CBI च्या विशेष कोर्टाने लालकृष्ण आडवाणी सहीत ३१ संशयीत आरोपीना कोणताही सबळ पुरावा नाही या कारणास्तव दोषमुक्त केले.या साठी कोर्टाने टिप्पणी पण केली की 'आरोपींनी एका रुम मध्ये बसून बाबरी मस्जीद पाडण्याची कोणतीही योजना बनविल्याचा पुरावा नाही'.मुरली मनोहर जोशी,उमा भारती,विनय कटीयार हे बडे नेते सुध्दा आरोप मुक्त झालेले आहेत. मस्जीद पाडल्यांनंतर अतिव आनंदाने सुश्री उमा भारती यांनी मुरली मनोहर जोशी यांना घट्ट मिठी मारल्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते. बाबरी मस्जीद पाडणे हि कारसेवकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती अशी ही नोंद या विशेष CBI कोर्टाने केली आहे.

दुसरी घटना हाथरस ची.वाल्मिकी समाजातील १९ वर्षिय तरुणीचा बलात्कार करून,चिभ कापुन अतिशय अमानवी पध्दतीने तिची हत्या करणे हि माणुसकीला काळिंबा आणणारी घटना.गरिब,असहाय्य पद दलितांना माणुसपण नाकारणारी भारतातील जातीव्यवस्था ही खरंतर अमानुष व्यवस्था आहे.स्वांतत्र्यांनतर सत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर सुध्दा जातिभेदाच्या भिंती गळून पडलेल्या नाहीत.गुन्हेगारांना जात नसते असं म्हटलं जातं.पण अमानुष बलात्कार आणी हत्या ची बहुसंख्य प्रकरणात मागासवर्गीय महीलांच्यांच बाबतीत का? हा प्रश्न निर्माण होतो.मागासांनी मागास च रहावं म्हणून साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर केला जातो.यावर कडी म्हणून मागासांच्या महीलांवर अत्याचार केला जातो.आणी कायदा व्यवस्था या कडे गांभीर्याने पाहत नाही.हाथरस प्रकरणात तर पोलिसांनी पिडीतेचा मृतदेहाचे स्वःतच अत्यसंस्कार केले.याचा अर्थच मुळी हे प्रकरण दाबणे आणी अजुन एका गुन्ह्याला उजेडात येऊ नये अशी व्यवस्था करणे असा होतो. मात्र जनक्षोभ लक्षात घेऊन उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण CBI ला वर्ग केले आहे.मात्र CBI ची विश्वासार्हता सुध्दा संशयास्पद आहे हे आपण वरील 30 सप्टेंबरच्या निकालावरून लक्षात घेऊ शकतो.थोडक्यात काय दलीत आणी मुस्लीमांची परिस्थिती अतिशय भंयावह आहे. आई जेऊ घालिना आणी बाप भिक मागू देईना अशी वेळ या वर्गावर आलेली आहे..

अशातच सरकार जे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या संरक्षणार्थ असते तेच आता कुंपणच शेत खातय असे निर्णय घेत चाललेले आहे.खाजगीकरणाची तलवार सपासप चालवून सरकार वंचीतांचे रोजगार हिरावून घेत चाललेलं आहे.कामगार हिताचे कायदा म्हणून गौरवण्यात आलेला कायद्याद्वारे कामगारांच्या हिताचे संरक्षण व्हायच्या ऐवजी कामगार देशोधडीला लागणार आहेत.कामगारांना कधीही काढून टाकण्याच्या अधिकार मालकांना बहाल करणे म्हणजे गायीला कसाबाच्याच्या तावडीत देण्यासारख्या तरतुदी असलेलं कामगाराच्या हिताचे? विधेयक सरकार आणतय याचा अर्थ आता अरण्य पेटलेलं असून, वंचीत व मागासांचे आयुष्य आता पुन्हा अंधार युगाकडे वाटचाल करत आहे.

तरी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

अलगिकरणःमाझा अनुभव

एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मी सोमवारी स्वँब दिला.मलकापूर येथील कोवीड सेंटर ने आमची रवानगी थेट सरूडच्या महाविद्यालयात केली.त्यांच्या प्रोसेसचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो.रिपोर्ट येई पर्यंत इन्स्टिट्यूशनल कोरोंटाईन होण क्रमप्राप्त होत.म्हणून मग आम्ही सरुड कॉलेजवर अलगीकरण कक्षात दाखल झालो.कॉलजेच्या नवीन आणी दर्जेदार इमारतीमध्ये अलगीकरण कक्ष उभारला आहे.कॉलेजच्या या इमारतीचा ताबा आता अलगिकरण कक्ष म्हणून आरोग्य विभागाकडे आहे.

आम्ही या अलगिकरण कक्षात दाखल झालो तेंव्हा दोन रुम मध्ये आधिच काही रुग्ण होते.म्हणून मग आम्ही तिसर्या रूम मध्ये प्रवेश केला जी रुम unlock होती. रुम मध्ये बेडस जमीनीवरच अथंरलेले होते. आधीच्या रुग्णांनी वापरलेल्या चादरी रुम मध्ये च असलेल्या किचन कट्ट्यावर अस्ताव्यस्त फेकल्या होत्या.रूम मध्ये उंदीर मामानी घाण केलेली होती.भर म्हणून बेडक्या सुध्दा होत्या.आणी रुम भरुन एक एकमेवाद्वितीय असा दर्फ येत होता.जो तुम्ही आता कदाचित फिल पण केला असेल.सो रूम अस्वच्छ होती आपल्या लक्षात आलं असेल.थोडक्यात काय बरेच दिवस रूमची स्वच्छता केलेली नव्हती.

मी या कक्षाचे इनचार्ज जाधव साहेबांना कॉल केला.त्यांचा नंबर आम्हाला गेटवर मिळाला होता.प्रत्यक्ष त्यांच दर्शन नव्हत झालं.साहेबांना सांगितलं की रुम अस्वच्छ आहे आणी रुम स्वच्छ करून मिळावी.साहेब म्हणाले रुम कालच स्वच्छ केलीय,सँनिटाईज सुध्दा केलीय आणी हवतर मी फोटो पाठवतो म्हणाले. पण मग मी त्यांना सध्याची अवस्था सांगितली तर ते बरं बरं म्हणाले.पुढचे दोन दिवस त्या रुम मध्ये आम्ही मुक्काम केला.

या अलगिकरण कक्षाचे एक वैशीष्ठ्य म्हणजे स्नानगृह व स्वच्छता गृहाची पुरेशी संख्या होय.स्वच्छतागृह आधुनिकपध्दतीचे कमोड आहेत. मात्र अलगीकरण केंद्रात येणारे रुग्ण हे खेड्यातील आणी कमोड वापर करता न येणारे असल्याकारणाने या कमोडचं सौदंर्य कमालीचे वाढलेले स्पष्ट दिसत होतं.सो जिव मुठीत घेऊन मुश्किलीने तिथे विधी उरकण्यावाचुन गत्यंतर नव्हता.कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने केंद्राच्या या इमारती मध्ये रुग्णाशिवाय कोणी ईकडे फिरकत नाही.कर्मचारी बिलकुल या केंद्रात येत नाहीत.इमारती बाहेरील लाईटस लावणे आणी बंद करणे हे रुग्णांचेच काम. कर्मचारी लांबुनच सांगतात लाईट बंद करा चालू करा.अर्थात हे मी समजू शकतो.त्यांना त्यांचा जिव महत्त्वाचा वाटणे स्वाभाविक आहे.इमारती मध्ये सर्व रुम ज्या उघड्या होत्या तेथील लाईटस आणी फँन चालू होते ते आम्ही बंद केले.मात्र अश्या अजूनही काही रूम होते त्यातील लाईट आणी फँन चालूच होते.ते आम्हाला बंद करता आले नाहीत.राष्ट्रीय संपत्तीची अशी हानी होताना आम्हाला खुप वाईट वाटलं.दोन दिवसाच्या तेथील वास्तव्यात सकाळी नाष्टा,दोनवेळचं जेवण आणी सांयकाळी चहा मिळाला.

तिसर्या दिवशी इनचार्ज साहेब सुहास्य वदनी उगवले.त्यांनी आमचं टेपंरेचर घेतलं जे खुप सामान्य होतं.अर्थात ते इमारतीच्या बाहेर २० फुट अंतरावर  आम्हाला बोलावून घेवून त्यांनी टेंपरेचर घेऊन औषधं लागली तर सांगा म्हणाले.दोन तीन दिवस तब्बेत चांगली असल्यांने रिपोर्ट नॉर्मल येईल आम्हाला कुठं इथे या ठिकाणी कायम राहायचयं असा विचार करून राहीलो. मात्र आरोग्य विभागाचं किंवा हे अलगिकरण केंद्र ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांच केंद्राकडे  साफ दुर्लक्क्ष आहे.हि गोष्ट खरंच अक्षम्य आहे कारण कोरोना निगेटीव्ह असलेल्या पेशंटला इथल्या अस्वच्छतेमुळे प्लेग किंवा अन्य कुठले तरी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरंतर व्यवस्थापन गुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा प्रजाहित दक्ष कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज यांनी केलेल्या साथीच्या रोगाचे निंयत्रण व रोग्यांचे रिहँब करण्याचं तंत्र होतं त्याचा वारसा सांगणार्या माझ्या महाराष्ट्रात कुठतरी असाही वाईट अनुभव येतो.तेंव्हा वाटतं सार्वजनिक सेवांच्या बाबतीत आणिबाणीच्या काळासाठी आपण प्रिपेर्ड राहणं आवश्यक आहे.मात्र सगळंच चित्र काय गडद काळं नाही.डॉक्टर्स,पँरामेडीकल स्टाफ, पोलीस,सरकार उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम आपला.

काल रात्री माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला.ही एक मस्त छान पॉझिटिव्ह गोष्ट मात्र घडली आणी आता मि अगदी ठणठणीत घरातच रुम कोरोंटाईन आहे..

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

शिक्षक दिन

जाधव बाई माझ्या पहिल्या शिक्षिका...त्यांनी मला मुळाक्षरे शिकवली...इयत्ता ४थी मध्ये असताना छोटे प्रयोग करून दाखवले...ते दिवस आणी त्या वेळचं वातावरण खुप मिस करतोय...

नेपोलियन बोनापार्ट म्हणून एक फ्रेंच सम्राट होऊन गेला.त्याच्या मृत्यूपत्रात त्याने काही संपत्ती आपल्या बाईंच्या नावे ठेवली होती...त्यांने लिहुन ठेवलं होत.."मला धुळाक्षरे शिकवणार्या बाईंसाठी.." केवढा आदर शिक्षकांप्रती...आणी केवढ्या ताकतीचे शिक्षक पण होते तेंव्हा..

शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती असताना कुठल्या तरी गल्फ कट्रींला भेट दिली तर त्यांना न्यायला त्या देशाचा राजा आला होता..त्यांने स्वतः शर्मांच्या गाडीचे सारथ्य केलं.राजा ला कुणीतरी विचारलं तर राजा म्हणतो कसा? ते माझे गुरू आहेत...पुण्यात असताना शिकवायचे..आदर्श सरांचा आदर्श  विद्यार्थी...

आपल्या कडे असेही काही गुरूजी होऊन गेले जसे विद्यार्थ्यांकडून अंगठा मागणारे त्यांच्या वर अन्याय करणारे.आज आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी धडपडणारे शिक्षक पाहीले की किव येते.पुरस्कार मिळाला की जेवण पार्टि देणारे शिक्षक हे आजचं वास्तव.शिक्षकांना पुरस्कार देणार्या अनेक संस्था कुत्र्याच्या भुछत्रा प्रमाणे उगवल्या आहेत..ते पुरस्कार वाटतात...शिक्षक आदर्श बनतात.

शिक्षक आदर्श असावा का? तर असावा मात्र आदर्श पुरस्कार मिळवायचा सोस त्याला नसावा.काहींची मत भिन्न असतील.असू शकतात.मि मात्र ठरवलयं की कुठलाही पुरस्कार न घेता रिटायर्ड व्हायच...माझ्या कामाची पावती मी पेरलेला विचार आणी माझे विद्यार्थी....अनेक शिक्षक एकाद्या यशस्वी विद्यार्थ्या बद्दल भरभरून बोलतात..तो माझा विद्यार्थी आहे अस अभिमानाने सांगतात...तसं अपयशी ठरलेल्या एकाद्या विद्यार्थ्यांच क्रेडीट ते घेतात का? घ्यायलाच पाहीजे...मी या विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठे कमी पडलो याची सल शिक्षकाला पाहीजे...

असो खुप ओव्हर झालं..पण माझ्या मनात शिक्षकांबद्दल खुप आदर आहे...एवढे विचार व्यक्त करायचं सामर्थ्य सुध्दा शिक्षकांनीच दिलय याची जाणिव आहे...त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम.....

रविवार, २४ मे, २०२०

जनता,नेता आणी कार्यकर्ता

जय भिम मंडळी..( हा लेख एका whats app ग्रुप साठी लिहीला होता)
एवढ्या सकाळच्या पारी ह्यो लांबडा लेख पाहून अचंबित व्हाल.तस काय आश्चर्य वाटून घेऊ नका.जे जे आपणास ठावे...या उक्तीप्रमाणे आमचं चाललेलं असतं,एवढंच.गेल्या काही दिवसांपासून 'कृष्णाकाठ'वाचतोय.कृष्णाकाठ हे दिंवगत नेते यंशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र. मोबाईल आल्यापासून पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालय खरं.पण काही पुस्तक वाचायला आवडतील इतकी चांगली आहेत.मी हे पुस्तक वाचतोय आणी या पुस्तकातील साधी,सरळ भाषा लळा लावतेय.
या पुस्तकाची पार्श्वभूमी पारतंत्र्याची,स्वातत्र्यासाठी सुरू झालेल्या राजकीय चळवळीची.चव्हाण साहेब आपल्याला त्या काळातील सातारा परिसरातील चळवळीचा इतिहास सांगतात.शिक्षण घेत घेत राजकारणाशी त्यांचा संबध कसा आला ते सांगतात.१९३७ मध्ये विधीमंडळांच्या निवडणूका कशा जाहीर झाल्या व त्या निवडणूकी मध्ये आपल्या नेत्याला कसं लढवून आणलं याच वर्णन मला आवडलं.सातारा परिसरात चव्हाण साहेब आणी त्यांचे सहकारी कॉग्रेस अतर्गंत चळवळीमध्ये भाग घेत असत.सविनय कायदेभंग,जेलभरो आदोंलन,जेलच्या आतमध्ये शिक्षण,थोरामोठ्यांचा सहवास यातुन एक कार्यकर्त्याचा पिंड आकारास येत होता.उद्याच नैतृत्व त्यातुनच फुलणार होतं.पुढे कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुध्दा सातारा येथील चळवळीकडे सुध्दा साहेब लक्ष ठेवून होते.

दरम्यान विधीमंडळाच्या निवडणूका लागतात.विधीमंडळात आपल्या तरूण शेतकरी सुसंस्कृत मित्राला,आत्माराम पाटील यांना संधी मिळावी आणी त्यांना तिकिट मिळावी या साठी सातार्यातील बुजूर्ग मंडळीना भेटणे.त्याचबरोबर आत्माराम पाटील यांच्या नैतृत्वाला संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे अस साहेबांचे काम चालू होतं.दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना जाऊन भेटणे आणी तिकीटाविषयी आग्रह करण्याची जबाबदारी यंशवंतरावावर येऊन पडते तेंव्हा ते सरदारांना जाऊन भेटतात.ही त्यांची भेट मुंबई मध्ये होते.दोन तीन मिनीट सरदार यंशव़ंतरावाना ऐकून घेतात आणी मोजके प्रश्न विचारतात.या भेटीचा परिणाम काय होईल या अनिश्चिततेमध्ये साहेब सातार्याला परततात.पण सुदैवानं आत्माराम पाटील यांना तिकीट मिळतं.मग सुरू होतो प्रचार.कार्यकर्ते असलेले चव्हाण साहेब मग कराड आणी पाटण परिसर अक्षरशः पिंजून काढतात. हा सर्व परिसर ते कधी सायकल तर कधी चालत फिरतात.लोकांना जाऊन भेटतात आणी आपल्या मित्राला म्हणजे आत्माराम पाटील यांना निवडून आणतात.ही गोष्ट आपण येथेच थाबंवू.

या गोष्टीवरून आपणास काय समजते? नेत्याला प्रस्थापित करण्यामध्ये कार्यकर्त्याची भुमिका महत्वाची असते हेच ना? किंवा प्रस्थापित नेत्याला जनमानसात वाढविण्याची सुध्दा जबाबदारी कार्यकर्त्यांने पार पाडायला हवी.कार्यसम्राट नेते असतील तर त्यांची प्रतिमा आणी त्यांच्या कार्याचा प्रचार आणी प्रसार करण्याची महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांचीच असते. एवढंच नव्हे जनतेच्या इच्छा आकांक्षा त्याच्या समस्या,अडचणी यांना वाचा फोडण्याचं काम सुध्दा कार्यकर्त्यांच.म्हणजे एका अर्थाने कार्यकर्ता हा जनता आणी नेता या दोघांमधला दुवा असतो. आपले कार्य अस महत्वपूर्ण असल्याने कार्यकर्त्याने जागरूक राहून काम केलं पाहीजे अन्यथा नेत्याचा कपाळमोक्ष आणी जनतेचा भ्रमनिरास होतो.लाभार्थी कार्यकर्ता नेत्याचा खुषमस्कर्या बनला तर धोका ठरलेलाच असतो.अलिकडच्या काळात हे चित्र आपल्याला सगळीकडं दिसत.कार्यकर्ता नेत्याशी सलगी साधतो नेत्याची हूजरेगिरी करतो.नेत्याबरोबरचे फोटो घरात,गाडीत आपल्या ऑफिस मध्ये लावतो, नेत्याचा ताईत बनतो.त्याचवेळी तो जनतेकडे दुर्लक्ष करतो.त्यांच्या समस्या आणी अडचणी त्याच्या दृष्टीने गौण बनतात.आणी आपल्याच भातावर तुप कसं पडेल याच्या विचारात कार्यकर्ता राहतो.आणी याचा परिणाम व्हायचा तोच होतो.कार्यसम्राट नेता कामाचा डोंगर उभा करून पण सफशेल पडतो,अपयशी ठरतो.त्याचं हे अपयश खरतर कार्यकर्त्यांचं अपयश असतं....

हेमंत तेलवेकर

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

सार्वकालीन गांधीजी

काल शाळेत महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.सकाळी मुले मोठ्या उत्साहाने शाळेत जमली होती.संयोजकांनी पण छान तयारी केली होती.एका मोठ्या टेबलवर गांधीजी आणी शास्त्रींची प्रतीमा ठेवण्यात आली होती.प्रतीमेपुढे फुले,आरती,अगरबत्ती वगैरे होत.सत्रसंचलन सुतार सर करत होते.प्रतीमापुजन झाल्यावर त्यांनी मला प्रास्ताविकासाठी निमंत्रित केलं.गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या कार्याचा आढावा घेऊन मी प्रास्ताविक संपवलं.मग शाळेतील मुलींनी मनोगत व्यक्त केलं.शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख जंगम सराचं भाषण झालं.आपल्या भाषणात त्यांनी व्यसनमुक्ती बद्दल गांधीजीचे विचार सांगितले,व पुढे म्हणाले की आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात थोडी त्रुटी राहीली आहे.मुख्याध्यापक म्हणून सरांचं मार्गदर्शन पर भाषण शेवटी ठेवायच्या ऐवजी त्यांना प्रास्ताविक करायला लावल,त्याबद्दल दिलीगिरी.अर्थात माझ्या हे डोक्यात नव्हत.शिवाय मार्गदर्शन करण्याइतपत मी स्वतः ला एवढा मोठा पण समजत नाही.पण त्याक्षणी गांधीजीच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग मला आठवला.जंगम सरांच भाषण आटोपल्यावर मी सरांच्याकडून माईक घेतला आणी तो प्रसंग सांगीतला.
१९३३-३४ ची गोष्ट Marylebone cricket club(MCC) भारतात क्रिकेट खेळायला आला होता.डग्लस जार्डिन त्यांचा कप्तान होता.भारता कडून फलंदाजीची सुरवात विजय मर्चंट करणार होते.विजय मर्चंट यांची बहीण क्रिकेट ची चांगलीच फँन होती.सामना अहमदाबादला खेळवला जाणार होता.आणी शहरात गांधीजी पण होते.विजय मर्चंट यांची बहीण गांधीजीना भेटायला गेल्या. ऑटोग्राफ साठी त्यांनी गांधीजीना आग्रह केला.गांधीजीनी वही हातात घेतली.एका पानावर त्यांना MCC च्या खेळाडूंंचे ऑटोग्राफस दिसले.एकदंरीत सोळा खेळांडुंच्या सह्या होत्या.गांधीजीनी पेन हातात घेतलं आणी १६ च्या खाली १७ वा नंबर टाकला.पुढे MK GANDHI अस लिहलं व सही केली.गांधीजींची ही कृती किती साधेपणाची आणी नम्र पणाची आहे.मी आपल्या पैकीच एक आहे आणी वेगळा कोणी नाही हे दर्शवण्याचा तो एक छोटासा प्रयत्न.इग्रंज सरकार विरूध्द माझा लढा असला तरी सर्व सामान्य इंग्रजी माणसाच्या विरूध्द मी नाही हे गांधीजींचे सांगणे होते.या घटनेचा उल्लेख 'POLITICAL HUMAR' या पुस्तकामध्ये आला आहे.जुडसन कॉर्नली त्याचे लेखक आहेत.
                 गांधीजीच्या या कृतीचा उल्लेख करून मी पुढे म्हणालो की गांधीजीच्या जयंती दिना निमीत्त गांधीजीचा नम्रपणा आपण स्विकारायला पाहीजे.गांधीजीच्या विचाराची अमंलबजावणी न करता त्यांच्या तत्वज्ञानावर केवळ विद्वत्ता प्रचूर भाषणं देण सर्वस्वी चुक राहील.आणी म्हणून प्रास्ताविक कोणी केलं या पेक्षा गांधीजींच्या विचाराचा जागर होणं महत्वाचं.

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

Good events bad events..

'I put 100% in it yet it doesn't work' I wonder many a times.It happens number of times when you do things with all your heart but that brings you nothing but disappointment and agony.It may be because you care for it when you should have least cared for it.Relationship is one of those things.You hold on some relationships because you think this is what you assume a goal of your life.
  Good relationships should be taken care of as they say.I think differently,'care' not..'understanding' is a thing that makes your relationships strong.I should trust my partner and not on things that arise out of over-thinking.Trusting our partners requires to trust within,Self belief.Believing that you have taken a right decision relieves tension and inner turmoil.Good relations let you go,give you freedom to be what you are.Moreover they accept you and accept you with what you have done and with all your follies.It would sound like some ideal thing, but it has become requisite.If it is hard for you and your partner you should frankly part your ways.It doesn't happen like this way usually in human relationship, and grudge prevails. 
        We human beings are gifted with memories.We cherish good and bad memories for many days.Memories make you a person of your kind.Good events in your life become sweet memories in your mind, and bad events become noteworthy experiences.We don't like experience and especially bad experiences,but we love sweet memories.We want to taste that sweetness. When sweetness becomes rare we loose hope.
                  Sweetness of sweet people is always you are looking for.You love sweet people and love them to be with you. But have you ever thought that their sweetness be spread on the huge plateu of people they care?

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

देणार्याने देत जावे..

                                                                                                                                                                                                         


त्या सकाळी  लवकर उठलो.रात्रभर तशी झोपच नव्हती लागली.सवयी प्रमाणे मोबाईल हातात घेतला.ट्विटर वर नजर फिरवत होतो.तेवढ्यात एका ट्विट ने माझ लक्ष वेधून घेतलं.आनंद महिन्द्रा यांच ट्विट होत ते.MAHINDRA& MAHINDRA कंपनीचे प्रमुख आनंद महिद्रां यांच.ते लिहितात "RISE is not just a philosophy that lies on the shelf & cited only in interviews & speeches. It’s what we practice; what we live & breathe every day"(संकटावर मात करून पुन्हा ताठ मानेनं उभा राह्यच असत हे केवळ आम्ही सभा समारंभात सांगत नाही तर त्याची आम्ही अक्षरशः अंमलबजावणी करतो).किती सुंदर विचार आहे ,नय?
           सकाळचे सगळे सोपस्कार आवरून मी शाळेत गेलो. थोडा वेळ गेला असेल नसेल तोवर एक ट्रक शाळेच्या दारात आला.'टेक महिन्द्रा' कंपनी कडून आमच्या शाळेला मदत घेऊन आलेला ट्रक होता तो.'टेक महिद्रा' हि महिंद्रा समुहाचीच एक कंपनी आहे.महापूर येवून गेला .खर शिरोळ तालुक्यात प्रचंड नुकसान झाल.अनेकांचे संसार उधवस्थ झाले.जनावरे दगावली.शिरोळ मधील त्रेपन्न पैकी सत्तेचाळीस गाव महापूराच्या दणक्यात सापडली.गावोगाव हीच महापुराची अवस्था होती.महापूर एक पण कहाण्या अनेक.प्रत्येकाची कहाणी वेगळी पण दुखाची तीव्रता तीच.अशावेळी माणुसकीचा प्रत्यय आला.पुणे मुंबई तसेच उर्वरीत महाराष्ट्रामधून अनेक सामाजिक संस्था, अनेक कंपन्या अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी शिरोळ मधील पुरग्रस्त लोकांना मदत केली.माणुसकीचा गहिवर पाहायला मिळाला.तालीक्यातील अनेक शाळांना मदत मिळाली.कुणी विध्यार्थ्यांना वह्या पुस्तके दिली.कुणी दप्तर दिल. मात्र शाळांचे जे नुकसान झाल होत ते सुद्धा प्रचंड होत.अनेकांनि शाळांना मदत केली.
               महापूर येवून गेल्यानंतर आमच्या शाळेला tech mahindra कंपनीच्या लोकांनी भेट दिली.खरतर ते जेव्हा शाळेत आले होते तेव्हा शाळेला सुट्टी होती.शनिवार होता तो.सकाळची शाळा होती.दुपार नंतर सुट्टी होती. नेमक त्याच दरम्यान आमच्या शाळेत महिंद्र ग्रुपचे राजेन्द्र शिखरे व त्यांचे सहकारी भेट देवून गेले.शाळेच्या परिसरात असलेल्या कुणा कडून त्यांनी आमचा नंबर मिळवला.आम्हाला त्यांनी संपर्क केला व आवश्यक ती कागदपत्र तयार ठेवयाला सांगितल.त्यांनी आम्हाला कागदपत्र मोबैल वर पाठवयाला सांगितली.त्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही सगळ केल.आम्हाला अस वाटल कि सगळीकड ज्या प्रमाने अनुभव येतो तसच काहीतरी होईल.साधारण महिनाभर गेला दरम्यान मध्यंतरी पुन्हा एकदा पूर येतोय कि काय अशी अवस्था झाली होती.त्यामुळे महिंद्र ग्रुप च्या लोकांना तारखा ठरवणे अवघड बनले.आणि एक दिवस मला राजेंद्र शिखरेंचा फोन आला.कि आम्ही २० सप्तेम्बर ला येत आहोत.सुरुवातीला विस्वासच बसला नाही.मात्र ते आले आणि प्रचंड मदत दिली.शाळेच्या सर्व गरजा विचारात घेवून त्यांनी खूप काही दिल आम्हाला.त्यात महत्वाच म्हणजे दोन संगणक,प्रिंटर,साउंड सिस्टीम ,फिल्टर ,कपाते व इतर बरच काही. जवळ पास लाखो रुअपे किमतीच्या वस्तू त्यांनी आम्हाला दिल्या.कंपनीच्या टीम बरोबर त्यंच्या हेड कल्पना मेडम होत्या.तरुण अभियान्त्यंची फौज सुद्धा होती.
                           मी विचार करतो लोक शाळांना एवढी भरभरून मदत कशी करतात?मला सापडलाय त्याच उत्तर लोक शाळांना राष्ट्रभक्तीच व्यासपीठ समजतात.शाळे मध्ये शिखनारी आजची मुले उद्याची इंजिनिअर्स,डॉक्टर्स,वकील,सैन्याधिकारी किव्हा शिक्षक असतील.ती जेव्हा आपल्या क्षेत्रात जातील तेव्हा ती आपल्या देशासाठी चांगल योगदान देतील असा विश्वास असतो लोकांना.म्हणून एखादि शाळा संकतात सापडते तेव्हा भरघोस मदत करायला लोक पुढे सरसावतात....


रविवार, ११ मार्च, २०१८

“Experiences about the desired change in students behavior by implementing the guidelines acquired through ETF meetings”.

     
INTRODUCTION:
Maharashtra Government and RAA Aurangabad have taken an initiative of creating English speaking eco_system in school campuse. English is taught in schools for many years. The importance of English language in 21st century is undeniable and one must know this language. English is a global language.It is a language of commerce and trade. It is a language of higher studies. It is a language of science and technology. The importance of knowing this language has increased two folds. Keeping all this points in mind, if we observe our students and our society, especially Marathi speaking community we find there is a great scope to develop language skills.
ETF MEETINGS:
The ETF meetings have been arranged for the interaction between teachers of English language from secondary schools. The effectiveness of such meetings is  immense. Teachers from different schools come together and discuss on various things that can be useful for conducting classroom activities. The punch line of this is “creating English speaking eco system” which I think is very apt. We live in pure Marathi speaking atmosphere so that we don’t get enough practice to listening and speaking of English language. This is the reason why Marathi speaking people are lagging behind. So that CHESS project came into existence,Creating tremendous opportunities to teachers of English language.
                                       We have taken part in four meetings so far. Each meeting was useful and important.we all teachers from our taluk took part in those meetings very enthusiastically. We aim at creating English speaking eco system in schools. That is why the responsibility upon us is equally important. It is said that the charity begins at home,meaning the desired change should start from yourself. We kept this in mind and discussed various ways so as to students increase intrest in English language. The first thing we learnt was to increase students talk time. for that we discussed on various ways to make students express themselves.
School activities
Increasing intrest in students of speaking English fluently was the main priority of us,the English teachers. We started with English day celebration in schools. Every Saturday students were supposed to take part in this celebration. The school assembly session was arranged in such a way so that students can conduct all the activies like reading new paper,joke sharing,moral story,good thought and prayer in English.At the initial stage they were under tremendous pressure but eventually the pressure was gone. Nowdays  they are very easy at such activities and conduct these things fluently.
We conducted many activites like live English, different language games, story telling, newspaper reading, debate, and many more. at the beginging, students were reluctant but the support they received from their teacher make them feel comfortable.
Teachers role:
Teachers role is very important part of chess project. All English teachers conduct all the activities interestingly.They are well aware that they are the intermediatery in creating English speaking eco system. keeping this in mind we at shirol block thought to get in touch more prequently. We created English teachers whatsapp group at block level. Presently there are 100 members in this group. Many of us are using twitter handle for expressing our views. We also use youtube for sharing videos of our class room activities. We do visit portals like “TED” more prequently where we get chance to listen to many famous personalities throughout the world. We leave no stone unturned for making our students confident and comfortable at English speaking.

FUTURE:
Pdt.Jawaharlal Nehru has rightly said “woods are lovely, dark, and deep but I have promises to keep and miles to go before I sleep”. The success of all educational policies is depend on teachers. The teacher is the only hope in this hopeless world.
I see very bright picture where a boy from rural ,Marathi speaking school is talking with a TV anchor in English very confidently. I with all my English teacher friends will work on this to come in reality.

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

PSM

प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र हा महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प  आता महाराष्ट्राच्या शाळांमधून  सुरु झालेला आहे.महाराष्ट्राला  देशपातळीवर प्राथम तीन क्रमांकावर आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणावयाचे आहे. विध्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा त्याला शिकण्यात मदत करण्याची भूमिका गुरुजींनी करायची आहे. विद्यार्थी ज्ञानाचे रचियेते असतात ते ज्ञानाची निर्मिती करू शकतात हि एक अभिनव संकल्पना आहे. जेव्हा व्यक्ती स्वतः ज्ञान  मिळवतो तेव्हा ते ज्ञान चिरकाल टिकणारे असते हि वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्याने ज्ञान मिळवन्यासाठी त्याला उद्युक्त करणे. त्याच्या विचारशक्तीला चालना देणे.त्याच्या मनातं उत्सुक्ता निर्माण करण्याचे काम गुरुजीचं आहे. म्हणजेच आता घोकमपट्टीला फाटा द्यायचा आहे. गुरुजी आता lecture देणार नाहीत ते आता facilitator होणार आहेत.विध्यार्थ्याला सारथी नकोय त्याला साथी हवाय हा दृष्टिकोण गुरुजींनी बाळगायचा आहे.  facilitator हा शब्द म्हणूच अर्थपूर्ण वाटतो. 
                                                        बालक नवीन काय तरी शिकतो तो कृतीतूनच.त्याच्या निसर्गदत्त भावनांना रोकायचं आणि त्याच्या डोक्यात कोंबायचं हि जुनाट पद्धती आपण फेकून देत आहोत.त्या ऐवजी त्याच्या सहज प्रवृत्ती प्रमाणे त्याला कृती प्रवण बनवायचं. त्यासाठी अनेक उपक्रम लाभदायक ठरतील.माझ्या शाळेत हळूहळू असे नवं नवीन उपक्रम राबवायला सुरु केलं आहे. पूर्वी देखील असे उपक्रम राबविले जात असायचे पण आता अधिक डोळस पणे असे उपक्रम राबविले जात आहेत. 
अ) जयंत्या-
विद्या विनयेन शोभते असं म्हणतात . बालक  हा मातीचा गोळा असतो . त्याला जसा आकार द्यावा तास तो होतो . या वयात त्याच्या समोर आदर्श व्यक्तीची उदाहरणे  ठेवली तर तो देकील तश्या आदर्श विचारांनी युक्त होऊ शकतो . manners are not taught manners are caught. हे इंग्रंजी वाक्य असच अर्थपूर्ण आहे . तुम्ही असं वागा असे न म्हणता  थोर माणसांनी असं वर्तन केलं होत  हे आपण बालकावर ठसवू शकतो . थोरा  मोठ्या माणसांच्या  जयंती  साजरी करणे  हि  बालकावर संस्कार करण्याची सुसंधी आहे  असं मला  वाटत .  म्हणूनच माझ्या  शाळेत  थोर स्त्री पुरुषांच्या जयंत्या  स्मृतिदिन  आम्ही साजरे करतो. 
ब )English Learning club-
प्रगती आणि इंग्लिश यांचं सख्य  काय आहे हे सगळ्यांना माहित आहे . भारतासारख्या  अनेक भाषा बोलणाऱ्या  देशात आंग्ल  भाषा  लोकांना  जोडण्याचं काम करते आहे . उच्च  शिक्षण असो कि व्यापार असो इंग्रजी  जाणणारा  हा  पुढे जातो  हे वास्तव आहे . मराठीचा आदर करण्याबरोबर  इंग्रजीचा  पुरस्कार   करण्याचे  धोरण  आपण स्वीकारले आहे.  इंग्रजीची  भीती कमी व्हावी म्हुणुन  मुलांना बोलायला उद्युक्त  केलं  जाते . बालकें  त्यांच्या  मित्रांच्या सोबत न  घाबरता इंग्रजी  बोलावेत म्हणून शाळेत  इंग्लिश लेअर्निग  क्लब सुरु केला आहे. 
                       शाळेतील इतर उपक्रम बद्दल  नंतर   बोलूच   पर्यंत  नमस्कार 













शुक्रवार, ६ जानेवारी, २०१७

PATRAKAR DIN

पत्रकार दिन 

आज पत्रकार दिन. महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची  मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती बाळशास्त्री जांभेकर यांनी.  कोणत्याही लोकशाहीवादी देशामध्ये पत्रकारितेला अन्यनसाधारण महत्व असते आणि त्याच कारणही तसेच आहे लोकशाहीचा चतुर्थ स्थंम्ब म्हणजे पत्रकारिता होय. लोकांच्या इच्छा,मत त्याच्या महत्वकांक्षा यांचं प्रतिबिंब म्हजे वृत्तपत्रे. राजकारण्यांना लोकमानस कळतो तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून. आज दळणवळणयाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती झाली आहे. वृत्तपत्राच्या जोडीला सोसिअल मीडिया आज लोकांच्या दिमतीला आहे. माहितीच्या विस्फोटाचा हा काळ आहे. एका क्लिक मध्ये आपणाला जगभरचे ज्ञान मिळते. पण त्यामुळे पत्रकारांच्या आणि हौसेखातर काहीही लिहिणारांच्या वर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. लेखणीचा वापर संयमशील रित्या व्हायला हवा. लोकांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचं काम पत्रकारांनी   करन गरजेचं आहे.
सामान्य माणसांनी पत्रकाराच्या त्यागाला सलाम केला पाहिजे.  यावर्षीची जर आकडेवारी काढली तर फार मोठा धक्का आपल्याला बसेल. अनेक पत्रकारांना यावर्षी आपल्या प्राणाला मुकावं लागलंय.लोकांसाठी त्यांना आपला जीव  द्यावा लागला. पत्रकारांना मी आजच्या दिनी शुभेच्या तर देतोच पण ज्यांनी हौतात्म्य पत्करलं अश्या  पत्रकारांचे मी स्मरण करतो.



ओमपुरी हा चतुरस्त्र अभिनेता आज आपल्याला सोडून गेला.. त्याची कमी आपल्याला वाटणार आहे.
http://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/1378229/actor-om-puri-passes-away-dead/










शनिवार, २ जानेवारी, २०१६

जनस्वास्थ्य सप्ताह२०१५

जनस्वास्थ्य दक्षता समीती कोल्हापूर,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाला मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनस्वास्थ्य अभियानामध्ये आमची शाला दि न्यू हायस्कूल चिंचवाड सहभागी झाली.आज ज स्त्रीचे महत्व आहे.व्यक्तीचा पहीला गुरू म्हणजे माता.म्हणून स्त्रियांना सहभागी करून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य आहे,हे ओलखून माता पालक मेलाव्याचे शालेत यशस्वी आयोजन झाल.श्री.जंगम सर यांनी उपस्थीतांचे स्वागत केले व कार्यक्रमाबद्दल माहीती दिली.मुख्याध्यापक तेलवेकर यांनी आपल्या मनोगतामधे पालकांनी मुलांना ओलखलं पाहीजे अस मत व्यक्त केले.त्याचबरोबर पालकांनी शिक्षकाची तर शिक्षकांनी पालकाची भूमिका केली पाहीजे अस प्रतिपादन केलं.श्री सुतार सर यांनी सर्वांचे आभार मानले,व मेलावा सपंन्न झाला .  सायंकाली ४वा.सायकल फेरी काढण्यात आली.या वेली विद्यार्थ्यानी पर्यावरण बचाओ आणी प्रदुषण टाला असा संदेश देणारे फलक आपल्या सायकल वर लावले होते. प्रदुषण मुक्त पर्यावरण टिकवण्याचेगासमोर ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच पर्यावरण,प्रदुषण व व्यसनाधीनता यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत.हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याची गरज आहे.यासाठी १जानेवारी ते ७ जानेवारी अखेर "जनस्वास्थ्य सप्ताह" कार्यक्रम आहे.
                               या कार्यक्रमाच्या पहील्या दिवशी शालेत  माता पालक मेलावा आयोजित केला होता.यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवत: अशी नारीचे म्हणजे आवाहन करणार्या घोषणा देखील वीद्यार्थ्यांनी दिल्या.
                दिनांक ३ जानेवारी ला सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रचंड योगदान दिल आहे.त्यांच्या त्यागामुले आणी प्रेरणेमुले मुली आज सर्व क्षेत्रात चमकत आहेत.
दिनांक ५जानेवारीला आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.यावेली जयसिंगपूर चे सरकारी दवाखाना पथक शालेत उपस्थित होत.














सैनिक : राष्ट्राच्या सीमांचा आणि मूल्यांचा रक्षक

सैनिकाचे कार्य अनेकदा फक्त देशाच्या सीमांचे रक्षण करणे यापुरते समजले जाते. मात्र, त्यांची खरी जबाबदारी त्याहीपेक्षा मोठी आहे. सैनिक हा केव...