बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

अलगिकरणःमाझा अनुभव

एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मी सोमवारी स्वँब दिला.मलकापूर येथील कोवीड सेंटर ने आमची रवानगी थेट सरूडच्या महाविद्यालयात केली.त्यांच्या प्रोसेसचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो.रिपोर्ट येई पर्यंत इन्स्टिट्यूशनल कोरोंटाईन होण क्रमप्राप्त होत.म्हणून मग आम्ही सरुड कॉलेजवर अलगीकरण कक्षात दाखल झालो.कॉलजेच्या नवीन आणी दर्जेदार इमारतीमध्ये अलगीकरण कक्ष उभारला आहे.कॉलेजच्या या इमारतीचा ताबा आता अलगिकरण कक्ष म्हणून आरोग्य विभागाकडे आहे.

आम्ही या अलगिकरण कक्षात दाखल झालो तेंव्हा दोन रुम मध्ये आधिच काही रुग्ण होते.म्हणून मग आम्ही तिसर्या रूम मध्ये प्रवेश केला जी रुम unlock होती. रुम मध्ये बेडस जमीनीवरच अथंरलेले होते. आधीच्या रुग्णांनी वापरलेल्या चादरी रुम मध्ये च असलेल्या किचन कट्ट्यावर अस्ताव्यस्त फेकल्या होत्या.रूम मध्ये उंदीर मामानी घाण केलेली होती.भर म्हणून बेडक्या सुध्दा होत्या.आणी रुम भरुन एक एकमेवाद्वितीय असा दर्फ येत होता.जो तुम्ही आता कदाचित फिल पण केला असेल.सो रूम अस्वच्छ होती आपल्या लक्षात आलं असेल.थोडक्यात काय बरेच दिवस रूमची स्वच्छता केलेली नव्हती.

मी या कक्षाचे इनचार्ज जाधव साहेबांना कॉल केला.त्यांचा नंबर आम्हाला गेटवर मिळाला होता.प्रत्यक्ष त्यांच दर्शन नव्हत झालं.साहेबांना सांगितलं की रुम अस्वच्छ आहे आणी रुम स्वच्छ करून मिळावी.साहेब म्हणाले रुम कालच स्वच्छ केलीय,सँनिटाईज सुध्दा केलीय आणी हवतर मी फोटो पाठवतो म्हणाले. पण मग मी त्यांना सध्याची अवस्था सांगितली तर ते बरं बरं म्हणाले.पुढचे दोन दिवस त्या रुम मध्ये आम्ही मुक्काम केला.

या अलगिकरण कक्षाचे एक वैशीष्ठ्य म्हणजे स्नानगृह व स्वच्छता गृहाची पुरेशी संख्या होय.स्वच्छतागृह आधुनिकपध्दतीचे कमोड आहेत. मात्र अलगीकरण केंद्रात येणारे रुग्ण हे खेड्यातील आणी कमोड वापर करता न येणारे असल्याकारणाने या कमोडचं सौदंर्य कमालीचे वाढलेले स्पष्ट दिसत होतं.सो जिव मुठीत घेऊन मुश्किलीने तिथे विधी उरकण्यावाचुन गत्यंतर नव्हता.कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने केंद्राच्या या इमारती मध्ये रुग्णाशिवाय कोणी ईकडे फिरकत नाही.कर्मचारी बिलकुल या केंद्रात येत नाहीत.इमारती बाहेरील लाईटस लावणे आणी बंद करणे हे रुग्णांचेच काम. कर्मचारी लांबुनच सांगतात लाईट बंद करा चालू करा.अर्थात हे मी समजू शकतो.त्यांना त्यांचा जिव महत्त्वाचा वाटणे स्वाभाविक आहे.इमारती मध्ये सर्व रुम ज्या उघड्या होत्या तेथील लाईटस आणी फँन चालू होते ते आम्ही बंद केले.मात्र अश्या अजूनही काही रूम होते त्यातील लाईट आणी फँन चालूच होते.ते आम्हाला बंद करता आले नाहीत.राष्ट्रीय संपत्तीची अशी हानी होताना आम्हाला खुप वाईट वाटलं.दोन दिवसाच्या तेथील वास्तव्यात सकाळी नाष्टा,दोनवेळचं जेवण आणी सांयकाळी चहा मिळाला.

तिसर्या दिवशी इनचार्ज साहेब सुहास्य वदनी उगवले.त्यांनी आमचं टेपंरेचर घेतलं जे खुप सामान्य होतं.अर्थात ते इमारतीच्या बाहेर २० फुट अंतरावर  आम्हाला बोलावून घेवून त्यांनी टेंपरेचर घेऊन औषधं लागली तर सांगा म्हणाले.दोन तीन दिवस तब्बेत चांगली असल्यांने रिपोर्ट नॉर्मल येईल आम्हाला कुठं इथे या ठिकाणी कायम राहायचयं असा विचार करून राहीलो. मात्र आरोग्य विभागाचं किंवा हे अलगिकरण केंद्र ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांच केंद्राकडे  साफ दुर्लक्क्ष आहे.हि गोष्ट खरंच अक्षम्य आहे कारण कोरोना निगेटीव्ह असलेल्या पेशंटला इथल्या अस्वच्छतेमुळे प्लेग किंवा अन्य कुठले तरी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरंतर व्यवस्थापन गुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा प्रजाहित दक्ष कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज यांनी केलेल्या साथीच्या रोगाचे निंयत्रण व रोग्यांचे रिहँब करण्याचं तंत्र होतं त्याचा वारसा सांगणार्या माझ्या महाराष्ट्रात कुठतरी असाही वाईट अनुभव येतो.तेंव्हा वाटतं सार्वजनिक सेवांच्या बाबतीत आणिबाणीच्या काळासाठी आपण प्रिपेर्ड राहणं आवश्यक आहे.मात्र सगळंच चित्र काय गडद काळं नाही.डॉक्टर्स,पँरामेडीकल स्टाफ, पोलीस,सरकार उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम आपला.

काल रात्री माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला.ही एक मस्त छान पॉझिटिव्ह गोष्ट मात्र घडली आणी आता मि अगदी ठणठणीत घरातच रुम कोरोंटाईन आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...