जाधव बाई माझ्या पहिल्या शिक्षिका...त्यांनी मला मुळाक्षरे शिकवली...इयत्ता ४थी मध्ये असताना छोटे प्रयोग करून दाखवले...ते दिवस आणी त्या वेळचं वातावरण खुप मिस करतोय...
नेपोलियन बोनापार्ट म्हणून एक फ्रेंच सम्राट होऊन गेला.त्याच्या मृत्यूपत्रात त्याने काही संपत्ती आपल्या बाईंच्या नावे ठेवली होती...त्यांने लिहुन ठेवलं होत.."मला धुळाक्षरे शिकवणार्या बाईंसाठी.." केवढा आदर शिक्षकांप्रती...आणी केवढ्या ताकतीचे शिक्षक पण होते तेंव्हा..
शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती असताना कुठल्या तरी गल्फ कट्रींला भेट दिली तर त्यांना न्यायला त्या देशाचा राजा आला होता..त्यांने स्वतः शर्मांच्या गाडीचे सारथ्य केलं.राजा ला कुणीतरी विचारलं तर राजा म्हणतो कसा? ते माझे गुरू आहेत...पुण्यात असताना शिकवायचे..आदर्श सरांचा आदर्श विद्यार्थी...
आपल्या कडे असेही काही गुरूजी होऊन गेले जसे विद्यार्थ्यांकडून अंगठा मागणारे त्यांच्या वर अन्याय करणारे.आज आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी धडपडणारे शिक्षक पाहीले की किव येते.पुरस्कार मिळाला की जेवण पार्टि देणारे शिक्षक हे आजचं वास्तव.शिक्षकांना पुरस्कार देणार्या अनेक संस्था कुत्र्याच्या भुछत्रा प्रमाणे उगवल्या आहेत..ते पुरस्कार वाटतात...शिक्षक आदर्श बनतात.
शिक्षक आदर्श असावा का? तर असावा मात्र आदर्श पुरस्कार मिळवायचा सोस त्याला नसावा.काहींची मत भिन्न असतील.असू शकतात.मि मात्र ठरवलयं की कुठलाही पुरस्कार न घेता रिटायर्ड व्हायच...माझ्या कामाची पावती मी पेरलेला विचार आणी माझे विद्यार्थी....अनेक शिक्षक एकाद्या यशस्वी विद्यार्थ्या बद्दल भरभरून बोलतात..तो माझा विद्यार्थी आहे अस अभिमानाने सांगतात...तसं अपयशी ठरलेल्या एकाद्या विद्यार्थ्यांच क्रेडीट ते घेतात का? घ्यायलाच पाहीजे...मी या विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठे कमी पडलो याची सल शिक्षकाला पाहीजे...
असो खुप ओव्हर झालं..पण माझ्या मनात शिक्षकांबद्दल खुप आदर आहे...एवढे विचार व्यक्त करायचं सामर्थ्य सुध्दा शिक्षकांनीच दिलय याची जाणिव आहे...त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम.....
Khup sundar likhan
उत्तर द्याहटवा