शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

पंचशिलनगर विकास मंच

मंडळी जयभिम

आज मी पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधतोय.विषय तसा महत्वाचा आहे अर्थात सध्यातरी तो माझ्यासाठी महत्वाचा आहे आशा करतो की हे वाचल्यानंतर तो आपल्यासाठी सुध्दा महत्वाचा होईल.पुन्हा एकदा नवीन whats app पोस्ट अस म्हणून आपण दुर्लक्ष करणार असाल तर ही बाकीच्या पोस्ट प्रमाणे ही पोस्ट unnoticed च होईल.मी भलां, माझ काम भलं, माझ कुटुंब भलं अशा मानसिकतेत आपल्यापैकी खुप जण आहेत.त्या विचाराने मनस्वास्थ्य जरूर लाभत असेल परंतू समाजाचं काय? हा प्रश्न मात्र निरूत्तरीत राहतोच.

समाजाच्या आयचा घो,समाज गेला खड्ड्यात. समाज कुठ शहाणा आहे असे बोलणारे अनेक नव विचारवंताचा सुळसुळाट आपल्याकडे झाला आहे.त्यांच्या या विचारामुळेच प्रत्यक्ष रणभूमीत कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रुतल्यासारख झालं आहे.आपल्याला तर बाबासाहेबांनी आवाहन केलय प्रगतीचा रथ पुढे नेण्याचं.नाही जमल तर रथ आहे तिथे तरी असू द्या परंतू हा रथ माघारी नेण नतद्रष्ट पणा असेल.आणी म्हणून आपणा सगळ्यांना आता कात टाकायला लागेल.जागे व्हायला लागेल.संपुर्ण देशच आता गोंधळाच्या स्थितीत आहे.आपणाकडे मात्र बाबासाहेबांचा विचार आहे.बाबासाहेबांसारखा पहाडी माणूस आपलं नैत्रूत्व करायला नसला तरी आपल्या प्रत्येकात बाबासाहेब आहेत.आपल्याला पुढे यायचं आहे.जाग्रूत व्हायच आहे.प्रत्येक गावातल्या प्रत्येक समाजाने डोळस पणे वागलं तर समाजाची प्रगती होईल.आपण झोपलो तर त्यांचे फावणार आहे.आपलं गप्प बसण्यामुळे त्यांच साधणार आहे.

आपल्या समाजापुढे दिवसेंदिवस अनेक समस्या उभ्या राहत आहेत.नोकर्यांचा प्रश्न जटील होणार आहे.नोकर्या तर सर्वांना मिळणार नाहीत म्हणून व्यवसायाची कास धरायला लागणार आहे.सरकारच्या अनेक योजना आहेत त्यांचा लाभ घेता येतो का बघून आपल्याला या कठीण परिस्थितीत तरायच आहे.खुप सार्या योजना आहेत मात्र त्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.पोहचवल्या जात नाहीत.ज्यांना माहीत असतं ते सांगत नाहीत.ज्याना माहीत होतात ते नेत्यांचे बगलबच्चे असतात. 

जिल्हा परिषद समाज कल्याण च्या दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत योजना, मागासवर्गीय व्यक्तींसाठींच्या योजना,14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या योजना अशा भरमसाट योजनेंचा पैसा येत असतो त्याच काय होतं याचा जाब विचारायला हवा.त्यासाठी माहीती घ्यावी लागेल.अनियमितता कुठे होतीय का तिकडे लक्ष ठेवावं लागेल.माझ्या समाजाला येणारा पैसा माझ्या समाजालाच मिळाला पाहीजे तो चार दोन बेरक्या लोकांच्या घशात जाता कामा नये या साठी जाग्रूत रहावं लागेल.

मी हे का करावं?मी समाजासाठी स्वतः च डोक का फोडून घ्यावं? असा आपल्या मनात प्रश्न आला असेल तर आठवा बाबासाहेबांना.स्वत: पुरत बघून बाबासाहेब मोठे श्रिमंत झाले असते परंतु बाबासाहेबांनी ज्ञान झोपडपट्टीपर्यंत नेल.झोपड्यात सुध्दा प्रकाशाचा कवडसा निर्माण झाला.म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी जाग्रूत व्हायला पाहीजे.समाजासाठी फारस काय करता आलं नाही तरी चालेल परंतू माझ्या समाजाला येणारा फंड जातो कुठ म्हणायला हवं.तो जर भलतीकडे जात असेल.तर तुकोबांच तत्व ध्यानात घ्यायला हवं. 
भले तरी देवू कासेची लंगोटी|नाठाळाच्या माथी हाणू काठी| 

मि माझ्या पुढील वाटचालीसाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आहे.पंचशिलनगरचा विकास हे माझं तत्वज्ञान आहे.विकास करता आला नाही तर निदान भकास होवू नये याचा ध्यास मी बाळगणार आहे.बदनामी,नालस्ती किंवा म्रृत्यूची तमा मी बाळगणार नाही.मी माझ्या समाजाला न्याय देण्याचा विचार कवटाळत आहे.मि आपणा सर्वांनाच आवाहन करतो आपणही माझ्या सोबत असा.पंचशिलनगर नागरिक संघ हे नाव बदलून पंचशिलनगर विकास मंच हे नाव आपल्या whats group ला दिलं जाईल.ज्यांना माझी कल्पना हास्यास्पद वाटेल,चुकीची वाटत असेल त्यांना मी आवाहन करत़ो आपण या ग्रुपमधून बाहेर पडु शकता.ज्याना माझ्यासोबत काम करायच आहे त्यांनी आपली मते या ग्रुपवर वेळोवेळी शेअर करत जा.जे जे आपली मते आपले विचार व्यक्त करणार नाही ते ते ग्रुपचा उद्देश्य स्विकारत नाहीत अस मानलं जाईल.

आपला हेमंत तेलवेकर....
२५ डिसेंबर २०२२
9890869098

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...