शनिवार, १० डिसेंबर, २०२२

एका मतदाराच्या नजरेतून..

मंडळी..


सध्या ग्रामपंचायत निवडणूक चे वारे जोरदार चालू आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी ग्राम स्तरावर लोकांचा सहभाग असण्यासाठी या निवडणुकांची उपयुक्तता खुपच महत्वाची असते.ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कमालीची चुरस आपल्याला बघायला मिळते.एक एक मत  महत्वाचे मानले जाते.सरूड सारख्या ग्रामपंचायती वर  एकाच गटाचे तब्बल पन्नास वर्ष वर्चस्व राहीलेले आपल्याला बघायला मिळते.इतक्या वर्षाचे वर्चस्व अर्थातच चांगल्या कामाची पोचपावती असते.सगळे काही आलबेल असताना सुध्दा काही बाबतीत कामांची आवश्यकता आहे, काही कामांची पुर्तता होणे गरजेचे आहे अस माझ्या सारख्या मतदाराला वाटते.खर तर ज्या बाबतीत काम होणे गरजेचे आहे त्या विषयांचा समावेश कुठल्याच पार्टिच्या किंवा गटाच्या अजेंडा वर नसतो.आणी म्हणूनच मला ग्रामस्तरावर जी कामे होणे आवश्यक वाटतं ती मी पुढे शब्दबद्ध करत आहे.सत्तेवर येणारे पॅनेल ही कामे पुढे रेटतील अशी मला आशा वाटते.किंबहुना पुढे जाऊन काम करण्यासाठी त्यांना यांचे नियोजन करता येण सोपं जाईल अस मला वाटतं.ती कामे पुढीलप्रमाणे...

1. वॉर्ड क्र. १ मध्ये हरीजनवाड्याचा समावेश आहे.येथील लोकांची मागणी आहे या हरीजनवाड्याचे सर्व सरकारदप्तरी नाव बदलून ते पंचशिलनगर व्हावे.

2. दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत व वैयक्तीक लाभाच्या योजनांबद्दल नागरिकांना पुरेशी माहीती नसते.नागरिकांना ही माहीती मिळावी यासाठी महीन्यातून किमान एकदा नागरिकांचा उद्बोधन वर्ग घ्यावा.

3.वैयक्तिक योजनांचा लाभ खुपदा तेच तेच घेत असतात.अशा लाभार्थ्यां शिवाय ज्यांना कधीच लाभ मिळाला नाही किंवा योजनेस पात्र आहेत अशांना लाभ मिळण्याची व्यवस्था पारदर्शक रित्या व्हावी.

4.घरफाळा भरला नाही किंवा पाणीपट्टी भरली नाही म्हणुन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कामासाठी लागणारे दाखले अडवून ठेवले जाणार नाहीत याकडे लक्ष दिले जावे.

5.दरवर्षी कोणत्या योजनेसाठी किती रक्कम खर्च केली गेली याची प्रसिध्दी केली जावी.विशेषतः दलित वस्ती वर खर्ची करण्यात येणारी रक्कम

6.गावामध्ये असणार्या प्राथमिक,माध्यमिक शाळांचा गुणवत्ता व दर्जा उत्तम असण्यासाठी विशेष बाब म्हणून सरंपचानी प्रत्येक महीन्यातून  एकदा शाळांचे जेष्ठ शिक्षक व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक घ्यावी.

7.सरूड गावामध्ये प्रक्टिस करणारे डॉक्टर्संनी आपले दवाखाने सरुडकर नागरिकांसाठी आहेत हे भान ठेवून सदैव गावात उपस्थित रहावे व बाहेर गावी असणार्या त्यांच्या ओपीडीज बंद कराव्यात जेणे करून गावातील रुग्णाची अजीबात आबाळ होणार नाही याची दक्षता सरपंच व नुतन सदस्यांनी घ्यावी.

8.सरकारी दवाखान्यातील कर्मचारी कामचुकार पणा करणार नाहीत व ते आपल्या ड्युटीवर नियमीत हजर राहतील याकडे लक्ष देणे.तसेच गावासाठी जादा कर्मचार्यांची मागणी करणे.

9. सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीयांना सुध्दा दवाखान्याचा खर्च परवडत नाही हे बघता गावातील डॉक्टर असोशियशन बरोबर बैठक घेऊन दवाखान्याचे चार्जेस पन्नास टक्क्याने कमी होतील असा प्रयत्न करणे.

10.गावातील नळ पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करणे व वैयक्तीक मालकिच्या नळाच्या पाण्याचा उपव्यय होत नाही याची खात्री करणे.

11.गावातील वाचनालयाचा दर्जा सुधारणे.नवीन पुस्तके खरेदी करणे. तसेच वाचनालयास स्वतंत्र इमारतीसाठी प्रयत्न करणे.

12. बलोपासनेचे महत्व व कुस्ती प्रेमींसाठी तालिम अद्ययावत करणे.

13.खेळामध्ये गावची मुले प्रगतीपथावर राहण्यासाठी शाळांमधून खेळांचे मार्गदर्शन योग्यरित्या होतं का यावर लक्ष ठेवणे.

14.ग्रामस्तरावर विवीध क्षेत्रामधील यशस्वितांचा गौरव करणे. त्यासाठी ग्रामपंचायती मार्फत सरुड -रत्न पुरस्काराची स्थापना करणे व दरवर्षी त्याचे वितरण करणे..



एक मतदार म्हणून माझ्या गावात वरील गोष्टी व्हाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. काही गोष्टि अर्थात अवाजवी असू शकतील.व्यक्ती परत्वे त्या वेगळ्या सुध्दा असू शकतील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...