सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

अरण्यरूदन

भारतीय दलीत महासंंघाने आयु.श्रीकांत कांबळे (आप्पा) यांच्या नैतृत्वाखाली काल सरुड मध्ये जन आंदोलन केले आणी हाथरस पिडीतेला न्याय मिळावा याची मागणी केली.उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदित्यनाथ ज्यांना योगी समजल जात पण ते भोगी आहेत त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध केला याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो.आप्पा यांच्या बरोबर महाविद्यालयीन जिवनात आम्ही भरपूर क्रिकेट खेळलो त्यावेळी ते आमचे कँप्टन होते.आज तर ते महासंघाचे नैतृत्व समर्थपणे करताहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे.खुपदा ते मला बोलले होते की बुध्दीजिंवींनी लेखणी चालवायला पाहीजे.आमची लेखणी तशी काय चालली नाही परंतु आप्पांनी मात्र आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर चळवळ जोरदार चालवली आहे. गेल्या पंधरा दिवसात शेतकरी हिताच्या आड येणार्या विधेयका विरोधातील आदोलन आणी हाथरस च्या अमानवी बलात्कार आणी हत्यांकांडाचा निषेध आदोलन मधुन पददलीत समाजाची एकी आपण दर्शविली आहे.

गेल्या दहा बारा दिवसात दोन घटना अशा घडल्या आहेत की ज्या मुळे अस वाटावं की या देशातील दलीत व मुस्लीम असुरक्षीत आहेत. बाबरी मस्जिद पाडाव प्रकरणी ३०सप्टेंबर ला CBI च्या विशेष कोर्टाने लालकृष्ण आडवाणी सहीत ३१ संशयीत आरोपीना कोणताही सबळ पुरावा नाही या कारणास्तव दोषमुक्त केले.या साठी कोर्टाने टिप्पणी पण केली की 'आरोपींनी एका रुम मध्ये बसून बाबरी मस्जीद पाडण्याची कोणतीही योजना बनविल्याचा पुरावा नाही'.मुरली मनोहर जोशी,उमा भारती,विनय कटीयार हे बडे नेते सुध्दा आरोप मुक्त झालेले आहेत. मस्जीद पाडल्यांनंतर अतिव आनंदाने सुश्री उमा भारती यांनी मुरली मनोहर जोशी यांना घट्ट मिठी मारल्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते. बाबरी मस्जीद पाडणे हि कारसेवकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती अशी ही नोंद या विशेष CBI कोर्टाने केली आहे.

दुसरी घटना हाथरस ची.वाल्मिकी समाजातील १९ वर्षिय तरुणीचा बलात्कार करून,चिभ कापुन अतिशय अमानवी पध्दतीने तिची हत्या करणे हि माणुसकीला काळिंबा आणणारी घटना.गरिब,असहाय्य पद दलितांना माणुसपण नाकारणारी भारतातील जातीव्यवस्था ही खरंतर अमानुष व्यवस्था आहे.स्वांतत्र्यांनतर सत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर सुध्दा जातिभेदाच्या भिंती गळून पडलेल्या नाहीत.गुन्हेगारांना जात नसते असं म्हटलं जातं.पण अमानुष बलात्कार आणी हत्या ची बहुसंख्य प्रकरणात मागासवर्गीय महीलांच्यांच बाबतीत का? हा प्रश्न निर्माण होतो.मागासांनी मागास च रहावं म्हणून साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर केला जातो.यावर कडी म्हणून मागासांच्या महीलांवर अत्याचार केला जातो.आणी कायदा व्यवस्था या कडे गांभीर्याने पाहत नाही.हाथरस प्रकरणात तर पोलिसांनी पिडीतेचा मृतदेहाचे स्वःतच अत्यसंस्कार केले.याचा अर्थच मुळी हे प्रकरण दाबणे आणी अजुन एका गुन्ह्याला उजेडात येऊ नये अशी व्यवस्था करणे असा होतो. मात्र जनक्षोभ लक्षात घेऊन उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण CBI ला वर्ग केले आहे.मात्र CBI ची विश्वासार्हता सुध्दा संशयास्पद आहे हे आपण वरील 30 सप्टेंबरच्या निकालावरून लक्षात घेऊ शकतो.थोडक्यात काय दलीत आणी मुस्लीमांची परिस्थिती अतिशय भंयावह आहे. आई जेऊ घालिना आणी बाप भिक मागू देईना अशी वेळ या वर्गावर आलेली आहे..

अशातच सरकार जे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या संरक्षणार्थ असते तेच आता कुंपणच शेत खातय असे निर्णय घेत चाललेले आहे.खाजगीकरणाची तलवार सपासप चालवून सरकार वंचीतांचे रोजगार हिरावून घेत चाललेलं आहे.कामगार हिताचे कायदा म्हणून गौरवण्यात आलेला कायद्याद्वारे कामगारांच्या हिताचे संरक्षण व्हायच्या ऐवजी कामगार देशोधडीला लागणार आहेत.कामगारांना कधीही काढून टाकण्याच्या अधिकार मालकांना बहाल करणे म्हणजे गायीला कसाबाच्याच्या तावडीत देण्यासारख्या तरतुदी असलेलं कामगाराच्या हिताचे? विधेयक सरकार आणतय याचा अर्थ आता अरण्य पेटलेलं असून, वंचीत व मागासांचे आयुष्य आता पुन्हा अंधार युगाकडे वाटचाल करत आहे.

तरी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

अलगिकरणःमाझा अनुभव

एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मी सोमवारी स्वँब दिला.मलकापूर येथील कोवीड सेंटर ने आमची रवानगी थेट सरूडच्या महाविद्यालयात केली.त्यांच्या प्रोसेसचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो.रिपोर्ट येई पर्यंत इन्स्टिट्यूशनल कोरोंटाईन होण क्रमप्राप्त होत.म्हणून मग आम्ही सरुड कॉलेजवर अलगीकरण कक्षात दाखल झालो.कॉलजेच्या नवीन आणी दर्जेदार इमारतीमध्ये अलगीकरण कक्ष उभारला आहे.कॉलेजच्या या इमारतीचा ताबा आता अलगिकरण कक्ष म्हणून आरोग्य विभागाकडे आहे.

आम्ही या अलगिकरण कक्षात दाखल झालो तेंव्हा दोन रुम मध्ये आधिच काही रुग्ण होते.म्हणून मग आम्ही तिसर्या रूम मध्ये प्रवेश केला जी रुम unlock होती. रुम मध्ये बेडस जमीनीवरच अथंरलेले होते. आधीच्या रुग्णांनी वापरलेल्या चादरी रुम मध्ये च असलेल्या किचन कट्ट्यावर अस्ताव्यस्त फेकल्या होत्या.रूम मध्ये उंदीर मामानी घाण केलेली होती.भर म्हणून बेडक्या सुध्दा होत्या.आणी रुम भरुन एक एकमेवाद्वितीय असा दर्फ येत होता.जो तुम्ही आता कदाचित फिल पण केला असेल.सो रूम अस्वच्छ होती आपल्या लक्षात आलं असेल.थोडक्यात काय बरेच दिवस रूमची स्वच्छता केलेली नव्हती.

मी या कक्षाचे इनचार्ज जाधव साहेबांना कॉल केला.त्यांचा नंबर आम्हाला गेटवर मिळाला होता.प्रत्यक्ष त्यांच दर्शन नव्हत झालं.साहेबांना सांगितलं की रुम अस्वच्छ आहे आणी रुम स्वच्छ करून मिळावी.साहेब म्हणाले रुम कालच स्वच्छ केलीय,सँनिटाईज सुध्दा केलीय आणी हवतर मी फोटो पाठवतो म्हणाले. पण मग मी त्यांना सध्याची अवस्था सांगितली तर ते बरं बरं म्हणाले.पुढचे दोन दिवस त्या रुम मध्ये आम्ही मुक्काम केला.

या अलगिकरण कक्षाचे एक वैशीष्ठ्य म्हणजे स्नानगृह व स्वच्छता गृहाची पुरेशी संख्या होय.स्वच्छतागृह आधुनिकपध्दतीचे कमोड आहेत. मात्र अलगीकरण केंद्रात येणारे रुग्ण हे खेड्यातील आणी कमोड वापर करता न येणारे असल्याकारणाने या कमोडचं सौदंर्य कमालीचे वाढलेले स्पष्ट दिसत होतं.सो जिव मुठीत घेऊन मुश्किलीने तिथे विधी उरकण्यावाचुन गत्यंतर नव्हता.कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने केंद्राच्या या इमारती मध्ये रुग्णाशिवाय कोणी ईकडे फिरकत नाही.कर्मचारी बिलकुल या केंद्रात येत नाहीत.इमारती बाहेरील लाईटस लावणे आणी बंद करणे हे रुग्णांचेच काम. कर्मचारी लांबुनच सांगतात लाईट बंद करा चालू करा.अर्थात हे मी समजू शकतो.त्यांना त्यांचा जिव महत्त्वाचा वाटणे स्वाभाविक आहे.इमारती मध्ये सर्व रुम ज्या उघड्या होत्या तेथील लाईटस आणी फँन चालू होते ते आम्ही बंद केले.मात्र अश्या अजूनही काही रूम होते त्यातील लाईट आणी फँन चालूच होते.ते आम्हाला बंद करता आले नाहीत.राष्ट्रीय संपत्तीची अशी हानी होताना आम्हाला खुप वाईट वाटलं.दोन दिवसाच्या तेथील वास्तव्यात सकाळी नाष्टा,दोनवेळचं जेवण आणी सांयकाळी चहा मिळाला.

तिसर्या दिवशी इनचार्ज साहेब सुहास्य वदनी उगवले.त्यांनी आमचं टेपंरेचर घेतलं जे खुप सामान्य होतं.अर्थात ते इमारतीच्या बाहेर २० फुट अंतरावर  आम्हाला बोलावून घेवून त्यांनी टेंपरेचर घेऊन औषधं लागली तर सांगा म्हणाले.दोन तीन दिवस तब्बेत चांगली असल्यांने रिपोर्ट नॉर्मल येईल आम्हाला कुठं इथे या ठिकाणी कायम राहायचयं असा विचार करून राहीलो. मात्र आरोग्य विभागाचं किंवा हे अलगिकरण केंद्र ज्यांच्या अखत्यारीत आहे त्यांच केंद्राकडे  साफ दुर्लक्क्ष आहे.हि गोष्ट खरंच अक्षम्य आहे कारण कोरोना निगेटीव्ह असलेल्या पेशंटला इथल्या अस्वच्छतेमुळे प्लेग किंवा अन्य कुठले तरी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खरंतर व्यवस्थापन गुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज किंवा प्रजाहित दक्ष कोल्हापुरचे छत्रपती शाहु महाराज यांनी केलेल्या साथीच्या रोगाचे निंयत्रण व रोग्यांचे रिहँब करण्याचं तंत्र होतं त्याचा वारसा सांगणार्या माझ्या महाराष्ट्रात कुठतरी असाही वाईट अनुभव येतो.तेंव्हा वाटतं सार्वजनिक सेवांच्या बाबतीत आणिबाणीच्या काळासाठी आपण प्रिपेर्ड राहणं आवश्यक आहे.मात्र सगळंच चित्र काय गडद काळं नाही.डॉक्टर्स,पँरामेडीकल स्टाफ, पोलीस,सरकार उत्तम काम करत आहेत त्यांना सलाम आपला.

काल रात्री माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला.ही एक मस्त छान पॉझिटिव्ह गोष्ट मात्र घडली आणी आता मि अगदी ठणठणीत घरातच रुम कोरोंटाईन आहे..

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

शिक्षक दिन

जाधव बाई माझ्या पहिल्या शिक्षिका...त्यांनी मला मुळाक्षरे शिकवली...इयत्ता ४थी मध्ये असताना छोटे प्रयोग करून दाखवले...ते दिवस आणी त्या वेळचं वातावरण खुप मिस करतोय...

नेपोलियन बोनापार्ट म्हणून एक फ्रेंच सम्राट होऊन गेला.त्याच्या मृत्यूपत्रात त्याने काही संपत्ती आपल्या बाईंच्या नावे ठेवली होती...त्यांने लिहुन ठेवलं होत.."मला धुळाक्षरे शिकवणार्या बाईंसाठी.." केवढा आदर शिक्षकांप्रती...आणी केवढ्या ताकतीचे शिक्षक पण होते तेंव्हा..

शंकर दयाळ शर्मा राष्ट्रपती असताना कुठल्या तरी गल्फ कट्रींला भेट दिली तर त्यांना न्यायला त्या देशाचा राजा आला होता..त्यांने स्वतः शर्मांच्या गाडीचे सारथ्य केलं.राजा ला कुणीतरी विचारलं तर राजा म्हणतो कसा? ते माझे गुरू आहेत...पुण्यात असताना शिकवायचे..आदर्श सरांचा आदर्श  विद्यार्थी...

आपल्या कडे असेही काही गुरूजी होऊन गेले जसे विद्यार्थ्यांकडून अंगठा मागणारे त्यांच्या वर अन्याय करणारे.आज आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी धडपडणारे शिक्षक पाहीले की किव येते.पुरस्कार मिळाला की जेवण पार्टि देणारे शिक्षक हे आजचं वास्तव.शिक्षकांना पुरस्कार देणार्या अनेक संस्था कुत्र्याच्या भुछत्रा प्रमाणे उगवल्या आहेत..ते पुरस्कार वाटतात...शिक्षक आदर्श बनतात.

शिक्षक आदर्श असावा का? तर असावा मात्र आदर्श पुरस्कार मिळवायचा सोस त्याला नसावा.काहींची मत भिन्न असतील.असू शकतात.मि मात्र ठरवलयं की कुठलाही पुरस्कार न घेता रिटायर्ड व्हायच...माझ्या कामाची पावती मी पेरलेला विचार आणी माझे विद्यार्थी....अनेक शिक्षक एकाद्या यशस्वी विद्यार्थ्या बद्दल भरभरून बोलतात..तो माझा विद्यार्थी आहे अस अभिमानाने सांगतात...तसं अपयशी ठरलेल्या एकाद्या विद्यार्थ्यांच क्रेडीट ते घेतात का? घ्यायलाच पाहीजे...मी या विद्यार्थ्याच्या बाबतीत कुठे कमी पडलो याची सल शिक्षकाला पाहीजे...

असो खुप ओव्हर झालं..पण माझ्या मनात शिक्षकांबद्दल खुप आदर आहे...एवढे विचार व्यक्त करायचं सामर्थ्य सुध्दा शिक्षकांनीच दिलय याची जाणिव आहे...त्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम.....

रविवार, २४ मे, २०२०

जनता,नेता आणी कार्यकर्ता

जय भिम मंडळी..( हा लेख एका whats app ग्रुप साठी लिहीला होता)
एवढ्या सकाळच्या पारी ह्यो लांबडा लेख पाहून अचंबित व्हाल.तस काय आश्चर्य वाटून घेऊ नका.जे जे आपणास ठावे...या उक्तीप्रमाणे आमचं चाललेलं असतं,एवढंच.गेल्या काही दिवसांपासून 'कृष्णाकाठ'वाचतोय.कृष्णाकाठ हे दिंवगत नेते यंशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र. मोबाईल आल्यापासून पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालय खरं.पण काही पुस्तक वाचायला आवडतील इतकी चांगली आहेत.मी हे पुस्तक वाचतोय आणी या पुस्तकातील साधी,सरळ भाषा लळा लावतेय.
या पुस्तकाची पार्श्वभूमी पारतंत्र्याची,स्वातत्र्यासाठी सुरू झालेल्या राजकीय चळवळीची.चव्हाण साहेब आपल्याला त्या काळातील सातारा परिसरातील चळवळीचा इतिहास सांगतात.शिक्षण घेत घेत राजकारणाशी त्यांचा संबध कसा आला ते सांगतात.१९३७ मध्ये विधीमंडळांच्या निवडणूका कशा जाहीर झाल्या व त्या निवडणूकी मध्ये आपल्या नेत्याला कसं लढवून आणलं याच वर्णन मला आवडलं.सातारा परिसरात चव्हाण साहेब आणी त्यांचे सहकारी कॉग्रेस अतर्गंत चळवळीमध्ये भाग घेत असत.सविनय कायदेभंग,जेलभरो आदोंलन,जेलच्या आतमध्ये शिक्षण,थोरामोठ्यांचा सहवास यातुन एक कार्यकर्त्याचा पिंड आकारास येत होता.उद्याच नैतृत्व त्यातुनच फुलणार होतं.पुढे कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सुध्दा सातारा येथील चळवळीकडे सुध्दा साहेब लक्ष ठेवून होते.

दरम्यान विधीमंडळाच्या निवडणूका लागतात.विधीमंडळात आपल्या तरूण शेतकरी सुसंस्कृत मित्राला,आत्माराम पाटील यांना संधी मिळावी आणी त्यांना तिकिट मिळावी या साठी सातार्यातील बुजूर्ग मंडळीना भेटणे.त्याचबरोबर आत्माराम पाटील यांच्या नैतृत्वाला संधी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे अस साहेबांचे काम चालू होतं.दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना जाऊन भेटणे आणी तिकीटाविषयी आग्रह करण्याची जबाबदारी यंशवंतरावावर येऊन पडते तेंव्हा ते सरदारांना जाऊन भेटतात.ही त्यांची भेट मुंबई मध्ये होते.दोन तीन मिनीट सरदार यंशव़ंतरावाना ऐकून घेतात आणी मोजके प्रश्न विचारतात.या भेटीचा परिणाम काय होईल या अनिश्चिततेमध्ये साहेब सातार्याला परततात.पण सुदैवानं आत्माराम पाटील यांना तिकीट मिळतं.मग सुरू होतो प्रचार.कार्यकर्ते असलेले चव्हाण साहेब मग कराड आणी पाटण परिसर अक्षरशः पिंजून काढतात. हा सर्व परिसर ते कधी सायकल तर कधी चालत फिरतात.लोकांना जाऊन भेटतात आणी आपल्या मित्राला म्हणजे आत्माराम पाटील यांना निवडून आणतात.ही गोष्ट आपण येथेच थाबंवू.

या गोष्टीवरून आपणास काय समजते? नेत्याला प्रस्थापित करण्यामध्ये कार्यकर्त्याची भुमिका महत्वाची असते हेच ना? किंवा प्रस्थापित नेत्याला जनमानसात वाढविण्याची सुध्दा जबाबदारी कार्यकर्त्यांने पार पाडायला हवी.कार्यसम्राट नेते असतील तर त्यांची प्रतिमा आणी त्यांच्या कार्याचा प्रचार आणी प्रसार करण्याची महत्वाची जबाबदारी कार्यकर्त्यांचीच असते. एवढंच नव्हे जनतेच्या इच्छा आकांक्षा त्याच्या समस्या,अडचणी यांना वाचा फोडण्याचं काम सुध्दा कार्यकर्त्यांच.म्हणजे एका अर्थाने कार्यकर्ता हा जनता आणी नेता या दोघांमधला दुवा असतो. आपले कार्य अस महत्वपूर्ण असल्याने कार्यकर्त्याने जागरूक राहून काम केलं पाहीजे अन्यथा नेत्याचा कपाळमोक्ष आणी जनतेचा भ्रमनिरास होतो.लाभार्थी कार्यकर्ता नेत्याचा खुषमस्कर्या बनला तर धोका ठरलेलाच असतो.अलिकडच्या काळात हे चित्र आपल्याला सगळीकडं दिसत.कार्यकर्ता नेत्याशी सलगी साधतो नेत्याची हूजरेगिरी करतो.नेत्याबरोबरचे फोटो घरात,गाडीत आपल्या ऑफिस मध्ये लावतो, नेत्याचा ताईत बनतो.त्याचवेळी तो जनतेकडे दुर्लक्ष करतो.त्यांच्या समस्या आणी अडचणी त्याच्या दृष्टीने गौण बनतात.आणी आपल्याच भातावर तुप कसं पडेल याच्या विचारात कार्यकर्ता राहतो.आणी याचा परिणाम व्हायचा तोच होतो.कार्यसम्राट नेता कामाचा डोंगर उभा करून पण सफशेल पडतो,अपयशी ठरतो.त्याचं हे अपयश खरतर कार्यकर्त्यांचं अपयश असतं....

हेमंत तेलवेकर

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...