सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

आईपण..

'Patient is serious' असा whats app वर डॉ.संतोष यांचा मेसज आला आणी मन चरकून गेलं. मी तात्काळ निर्णय घेतला.कोल्हापूरला जायला लागणार होतं.साधारण दिड तासात मी अस्टर आधार मध्ये पोहोचलो सुध्दा.दवाखान्यात विजय,प्रकाश आणी त्याच कुटुब सगळे ओढलेल्या चेहर्यांनी बसलेले होते.त्यांचे अनेक नातेवाईक सुध्दा जमलेले होते.सगळेच जण धास्तावले होते.विजयला गेल्या गेल्या मी भेटलो आणी परिस्थितीचा आढावा घेतला.त्याच्या बहीणीला,ज्योतीला ICU मध्ये ठेवलं होतं.मंगळवारीच तीच सिझर करण्यात आलं होत.सिझरियन नंतर तीची तब्येत खालावतच गेली होती.

मी डॉक्टर संतोष यांना भेटलो.only the miracle can save her डॉ बोलले.उपचाराला कोणताही प्रतिसाद पेशंट कडून नव्हता.लिव्हर निकामी झालं होत,किडन्या सुध्दा निकाम्या झाल्या होत्या आणी केवळ चमत्कारच पेशंटला वाचवू शकेल अशी परिस्थिती होती.प्रंसंग बाका होता.जवळपास लग्नाच्या विस वर्षांनंतर खुप प्रयत्न केल्यावर भारत आणि ज्योती यांच्या आयुष्यात आनंद प्रवेशला होता.गेली कित्येक वर्ष या उभयतांनी मुल होण्यासाठी नानातर्हेचे उपचार घेतले होते.ज्योतीने आता चाळीसी ओलांडली होती तरी मात्रूत्वाची ओढ तिला खुणावत होती.माझा जिव गेला तरी चालेल पण मी नवर्याला त्याचा वारस देणारच या विचाराने तिला झपाटलं होत.आणी अशातच ती गोड बातमी समजल्यापासून ते दोघेही आनंदून गेले होते.डॉक्टरांच्या निगराणीखाली सगळ व्यवस्थीत चालू असतानाच ज्योतीला सर्दी ताप खोकला जोराचा लागला.दोन चार दिवसांतच तीला डेंग्यूची लागण झाल्याच निष्पन्न झालं.डॉक्टरांनी मुलांच्या सुरक्षेसाठी आठव्या महिन्यातच सिझर करायचा निर्णय घेतला.

दोन्ही मुलांना प्रिमॅच्यूर म्हणून incubator मध्ये ठेवलं गेलं.ज्योतीने मुलांची तोडं पण पाहीली नाहीत.डेंग्यू मुळे तिची ताकतच संपून गेली.आणी ति बेशुद्ध अवस्थेत गेली.डाॉ त्यांच्या परिने प्रयत्न करत होते.पण प्रयत्नाला प्रतिसाद शुन्यच.हळूहळू तिचं लिव्हर डमेज झाल्याच कळालं.नंतर किडन्या निकाम्या झाल्या.multiple organ failure चाच प्रकार होता तो.नातेवाईक आणी भारतचे सर्व पोलीस सहकारी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित होते.संगळेच चिंतातूर होते.संतोष माझा वर्गमित्र तो एस्टर आधार मध्ये चिफ रेडीओलाजिस्ट होता.गुरुवारी संध्याकाळी तो मला पुन्हा एकदा भेटला.मी विचारलं त्याला.काय नेमकी परिस्थिती आहे ते.त्यांन मला सविस्तरपणे सगळं सांगितलं.आता भारतची मानसिकता तयार करणं गरजेच होत.त्याची अवस्था बघवत नव्हती.म्हणून मग त्याच्या जवळच्या मित्राला फोन केला.तो दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आला.त्याला सविस्तरपणे पणे मी सगळ सांगीतलं.ज्योती आता परत कधीच न येणार्या मार्गावर आहे हे सांगीतल.भारतला विश्वासात घेऊन त्याला समजावण्यात आलं.शेवटी दुपारी डॉ नी सांगुनच टाकलं ज्योती आता जगात राहीली नाही.

सुन्न झालेल्या सर्वांनीच हा निर्णय ऐकला.काहीतरी चमत्कार होईल अशी आशा घेऊन बसलेल्या नातेवाईकांनी दवाखान्याच्या बाहेर आक्रोश सुरु केला.हारलेल्या,खचलेल्या पराधिन माणसांचा तो टाहो होता.प्रसुतीच्या दरम्यान म्रुत्यू झाल्याने पोस्टम मार्टेम करण आवश्यक होत त्यासाठी ज्योतीच पार्थिव CPR ला नेण्यात आलं.मी विजय आम्ही सोबतच होतो.विजय सुध्दा कोलमडून गेला होता.पण सगळ यंत्रवत सुरु होतं.शवविच्छेदन कक्षात तिचं कलेवर पडुन होत.तिचा चेहरा शेवटचा एकदा बघून घ्यावा म्हणून मी तिच्या पार्थिवाजवळ गेलो. तिला जवळून बघीतलं.तिच्या चेहर्यावर स्पष्ट हसू दिसत होत. जणू विजयी होण्याचा आनंद तिच्या चेहर्यावर झळकत होता. आपलं आयुष्य गमवलं असलं तरी दोंन नवीन आयुष्य तिने प्रदान केली होती.वांझपणाचा कलंक पुसून तीने नवर्याला वारस दिले होते.आता ती अनंताच्या प्रवासाला चालली होती.मी खिंन्न मनाने तिच्याकडे बघत शवविच्छेदन कक्षातून बाहेर पडलो.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...