सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

आईपण..

'Patient is serious' असा whats app वर डॉ.संतोष यांचा मेसज आला आणी मन चरकून गेलं. मी तात्काळ निर्णय घेतला.कोल्हापूरला जायला लागणार होतं.साधारण दिड तासात मी अस्टर आधार मध्ये पोहोचलो सुध्दा.दवाखान्यात विजय,प्रकाश आणी त्याच कुटुब सगळे ओढलेल्या चेहर्यांनी बसलेले होते.त्यांचे अनेक नातेवाईक सुध्दा जमलेले होते.सगळेच जण धास्तावले होते.विजयला गेल्या गेल्या मी भेटलो आणी परिस्थितीचा आढावा घेतला.त्याच्या बहीणीला,ज्योतीला ICU मध्ये ठेवलं होतं.मंगळवारीच तीच सिझर करण्यात आलं होत.सिझरियन नंतर तीची तब्येत खालावतच गेली होती.

मी डॉक्टर संतोष यांना भेटलो.only the miracle can save her डॉ बोलले.उपचाराला कोणताही प्रतिसाद पेशंट कडून नव्हता.लिव्हर निकामी झालं होत,किडन्या सुध्दा निकाम्या झाल्या होत्या आणी केवळ चमत्कारच पेशंटला वाचवू शकेल अशी परिस्थिती होती.प्रंसंग बाका होता.जवळपास लग्नाच्या विस वर्षांनंतर खुप प्रयत्न केल्यावर भारत आणि ज्योती यांच्या आयुष्यात आनंद प्रवेशला होता.गेली कित्येक वर्ष या उभयतांनी मुल होण्यासाठी नानातर्हेचे उपचार घेतले होते.ज्योतीने आता चाळीसी ओलांडली होती तरी मात्रूत्वाची ओढ तिला खुणावत होती.माझा जिव गेला तरी चालेल पण मी नवर्याला त्याचा वारस देणारच या विचाराने तिला झपाटलं होत.आणी अशातच ती गोड बातमी समजल्यापासून ते दोघेही आनंदून गेले होते.डॉक्टरांच्या निगराणीखाली सगळ व्यवस्थीत चालू असतानाच ज्योतीला सर्दी ताप खोकला जोराचा लागला.दोन चार दिवसांतच तीला डेंग्यूची लागण झाल्याच निष्पन्न झालं.डॉक्टरांनी मुलांच्या सुरक्षेसाठी आठव्या महिन्यातच सिझर करायचा निर्णय घेतला.

दोन्ही मुलांना प्रिमॅच्यूर म्हणून incubator मध्ये ठेवलं गेलं.ज्योतीने मुलांची तोडं पण पाहीली नाहीत.डेंग्यू मुळे तिची ताकतच संपून गेली.आणी ति बेशुद्ध अवस्थेत गेली.डाॉ त्यांच्या परिने प्रयत्न करत होते.पण प्रयत्नाला प्रतिसाद शुन्यच.हळूहळू तिचं लिव्हर डमेज झाल्याच कळालं.नंतर किडन्या निकाम्या झाल्या.multiple organ failure चाच प्रकार होता तो.नातेवाईक आणी भारतचे सर्व पोलीस सहकारी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित होते.संगळेच चिंतातूर होते.संतोष माझा वर्गमित्र तो एस्टर आधार मध्ये चिफ रेडीओलाजिस्ट होता.गुरुवारी संध्याकाळी तो मला पुन्हा एकदा भेटला.मी विचारलं त्याला.काय नेमकी परिस्थिती आहे ते.त्यांन मला सविस्तरपणे सगळं सांगितलं.आता भारतची मानसिकता तयार करणं गरजेच होत.त्याची अवस्था बघवत नव्हती.म्हणून मग त्याच्या जवळच्या मित्राला फोन केला.तो दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी आला.त्याला सविस्तरपणे पणे मी सगळ सांगीतलं.ज्योती आता परत कधीच न येणार्या मार्गावर आहे हे सांगीतल.भारतला विश्वासात घेऊन त्याला समजावण्यात आलं.शेवटी दुपारी डॉ नी सांगुनच टाकलं ज्योती आता जगात राहीली नाही.

सुन्न झालेल्या सर्वांनीच हा निर्णय ऐकला.काहीतरी चमत्कार होईल अशी आशा घेऊन बसलेल्या नातेवाईकांनी दवाखान्याच्या बाहेर आक्रोश सुरु केला.हारलेल्या,खचलेल्या पराधिन माणसांचा तो टाहो होता.प्रसुतीच्या दरम्यान म्रुत्यू झाल्याने पोस्टम मार्टेम करण आवश्यक होत त्यासाठी ज्योतीच पार्थिव CPR ला नेण्यात आलं.मी विजय आम्ही सोबतच होतो.विजय सुध्दा कोलमडून गेला होता.पण सगळ यंत्रवत सुरु होतं.शवविच्छेदन कक्षात तिचं कलेवर पडुन होत.तिचा चेहरा शेवटचा एकदा बघून घ्यावा म्हणून मी तिच्या पार्थिवाजवळ गेलो. तिला जवळून बघीतलं.तिच्या चेहर्यावर स्पष्ट हसू दिसत होत. जणू विजयी होण्याचा आनंद तिच्या चेहर्यावर झळकत होता. आपलं आयुष्य गमवलं असलं तरी दोंन नवीन आयुष्य तिने प्रदान केली होती.वांझपणाचा कलंक पुसून तीने नवर्याला वारस दिले होते.आता ती अनंताच्या प्रवासाला चालली होती.मी खिंन्न मनाने तिच्याकडे बघत शवविच्छेदन कक्षातून बाहेर पडलो.....

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

भापुवि

मंडळी,

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणार्या कोल्हापुर जिल्ह्यातील स्थळांची यादी व त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षातील झालेली विकास कामे या बद्दल RTIact अन्वये मी भारतीय पुरातत्व विभागाकडे माहिती मागवली होती.या अर्जाला उत्तर देताना भापुवि ने म्हटलय की त्यांच्या अखत्यारीत पुढील स्थळे येतात
१ पन्हाळा किल्ला
२ पोहाळे गुहा
३ ब्रम्हपुरी (कोल्हापूर)
४ खिद्रापूर

याचाच अर्थ केवळ हि चारच स्थळे त्यांच्याकडे आहेत का की अजून काही ऐतिहासिक स्थळांचा उल्लेख करणं त्यांच्याकडून राहून गेलय हे कळायला मार्ग नाही..

विकास कामांच्या मुद्यांच्या बाबतीत त्यांनी म्हटलय की, G20 च्या भारतामध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनाच्या कामात स्टाफ व्यस्त असल्यामुळे संबधीत माहिती तात्काळ देऊ शकत नाही.भारत या वर्षी G20 चे अध्यक्षपद भुषवत आहे.संपुर्ण भारतात G20 समीटचे वातावरण उत्साहवर्धक आहे.मात्र मला हे कळत नाही की हि समिट होणार आहे संप्टेबंर महिन्यात दिल्लीमध्ये.मात्र मुबंईतील कार्यालयावर याचा भार कसा काय? मी समजू शकतो कार्यबाहुल्यामुळे संबधीत कार्यालय तात्काळ माहिती देऊ शकत नसेल सुध्दा पण भारत विश्वगुरु बनण्याच्या स्वप्नानी झपाटला असताना विवीध सरकारी कार्यालयांनी कामांच्या उरकाच्या बाबतीत झपाटा दाखवला तर भारत विश्वगुरू बनण्याच्या बाबतीमध्ये अजून एक पाऊल पुढे जाईल.

प्रश्न असा पडतो की संबधीत कार्यालय जाणिवपूर्वक तरी हे काम पुढे ढकलत नसेल ना?.गेल्या पाच दहा वर्षा मध्ये ऐतिहासिक,धार्मिक आणी सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कोल्हापूरातील महत्वाच्या स्थळांच्या बाबतीत भापुवि ने पुरेसे लक्ष दिलय का? विकासकामांवर खर्च केलाय काय?  हा सध्या तरी अनुत्तरित असणारा प्रश्न आहे.आपल्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असणार्या स्थळांच्या बाबतीत सार्वजनिक व सरकारी स्तरावरती देखील अनास्था आढळते.व ही महत्त्वाची स्थळे दुर्लक्षित राहतात.मग कुठली तरी संघटना आंदोलन वगैरे करते मग सरकार जागे होतं अशी परिस्थिती आहे.चला आशा करूया पुढच्या काळात हि परिस्थिती बदलेल.....

सोमवार, ३० जानेवारी, २०२३

माझा मुकनायक

मंडळी जयभिम

आजच्या दिवशी ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी पाक्षिक  'मुकनायक'सुरू केले.शोषित,वंचीत, गलितगात्र झालेल्या दलितांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी पत्रकारिता सुरू केली होती.बाबासाहेबांचे द्रष्टेपण यात दिसून येते. Educate, organise,agitate हा मंत्र देणारे बाबासाहेब लेखणीचे महत्व ओळखून होते.एक महान समाजशास्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक म्हणून ओळख असणाऱ्या बाबासाहेबांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला.मुकनायकचे ब्रिदवाक्य म्हणून त्यांनी संत तुकारामाच्या अभंगातील पुढील ओळी निवडल्या.

काय करू आता धरूनिया भीड।
नि:शक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण।
सार्थक लाजून नव्हे हीत ।।

आता भिड बाळगुन काय उपयोग नाही. लाजुन काय उपयोग नाही.समाजाचे दैन्य, दुःख आता मांडायलाच पाहीजे.अवनतीला पोहचलेल्या समाजाच्या  उत्थानासाठी आता टाहो फोडलाच पाहीजे अस या ओळी सांगतात.तुकारामांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.त्यामुळे तुकाराम सुध्दा आपलेच.मात्र ब्राम्हणी व्यवस्थेला तुकाराम धोकादायक वाटत असतील त्यामुळे काही क्षुद्र महाराज तुकारामांच्या वर अश्लाघ्य टिका करतात.त्यांचा निषेध करेल तेवढा थोडाच.

मुकनायक,बहिष्कृत भारत आणि प्रचंड ग्रंथसंपदा या मधुन बाबासाहेबांनी गुलाम झालेल्या समाजाच्या पायातील शृंखला तोडण्याचे काम केले.पुढे बाबासाहेब उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले.तेंव्हा मुकनायकचे व्यवस्थापनाचे काम ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्यावर येऊन पडले.खर तर बाबासाहेबांनीच त्यांच्यावर हि जबाबदारी सोपवली होती.ज्ञानदेव घोलप यांनी हि जबाबदारी समर्थपणे पेलली.ते सरुडचे होते हे सर्वज्ञात आहे.आपल्या ग्रुपचे सदस्य आयु.संकेत घोलप यांचे ते पणजोबा होते.सरुडकरांना अभिमान वाटेल अशी हि गोष्ट.

चला मुकनायकच्या स्थापनेच्या वर्धापनदिनी आपण संकल्प सोडूया की आमची दुःख,आमच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आता टाहो फोडणार.समाजाकडे दुर्लक्ष करणारे आणि अन्याय करणार्यांना आपण वठणीवर आणणार. कारण बाबासाहेबांनींच सांगितले होते 'अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो'.
 
(वाचुन थंड बसू नका..समाजाला आपल्या कडून काय योगदान मिळेल याचा विचार करा)


संघम सरणंम गच्छामी 

(हेमंत आकाराम तेलवेकर)

रविवार, १५ जानेवारी, २०२३

खदखद

मंडळी जयभिम

कुठून सुरुवात करायची कळत नाही.मनातली खदखद मात्र कशी दुर करायची कळत नाही.मी प्रवासात आहे बस मध्ये आहे पण आपल्याशी बोलावं हे तिव्रतेने वाटतय.मंडळी सध्या देशभर जे काही घडतय त्यामुळे सुज्ञ मंडळी अस्वस्थ आहेत.जे आपल्याच विश्वात मग्न आहेत त्यांच आपलं बर चाललय.मी माझ घर माझ कुटुंब एवढच त्यांच विश्व.अर्थात आपल्या आयुष्यात आपण सुखाने जगाव यासाठीच तर बाबासाहेबांनी व्यवस्थेविरुद्ध लढा दिला.पण हिच व्यवस्था उध्दवस्त करण्याच काम गल्ली पासून दिल्ली पर्यंत चालू आहे या बद्दल आपण जाणता का? जाणत असाल तर या बद्दल काही कराव अस आपल्याला वाटत? वाटत असेल ही पण काय करायच नेमक हे मात्र कळत नाही. माझी ही तिच अवस्था आहे.पण घटनांचा अन्वयार्थ लावणं तरी आपल्या हातात आहे.

नुकतच जयपूर मध्ये देशाचे उपराष्ट्रपती जयदिप धनकड यांनी जे व्यक्त केलं. ते विचार करण्यासारख आहे.१९७३ ला केशवानंद भारती केस चा जो निकाल आला त्यानुसार,घटनेच्या मुलभूत ढाच्याला संसंद किंवा कार्यकारी मंडळ धक्का लावू शकत नाही, बदल करू शकत नाही.त्यावेळच्या सरकारला घटनेचा मुलभूत गाभा बदलायचा होता.पण न्यायालयाने जो निकाल दिला त्यामुळे doctrine of basic structure चा हा निकाल आबाधित आहे.मात्र भाजप जेव्हा पासून सत्तेमध्ये आहे तेव्हा पासून त्यांची काय मानसिकता आहे हे लपून राहिलेले नाही.वाजपेयी सरकारच्या काळात न्या.वेंकटचलैया आयोग नेमला गेला होता या बद्दल मी तुम्हाला आधिच सांगितलय.घटनेच्या मुलभूत गाभ्याचे पुनराविलोकन करण्याचे काम त्या आयोगाला देण्यात आलं होत.आज मुलभूत गाभा बदलायचा उद्या घटनेतल्या तरतुदी बदलायच्या अस तरी धोरण राज्यकर्त्यांचे नाही ना? हि घटना आपल्यासाठी जिव की प्राण आहे.म्हणून जेंव्हा धनकड सारखा धांटगट माणूस बोलतो कि constitute assembly ला घटनेचा मुलभूत गाभा बदलण्याचा अधिकार असला पाहिजे तेंव्हा आपलं भविष्य काय असेल याचा धविचार करायलाच हवा.त्यामुळे आपल्याला खडबडून जागे व्हायला पाहीजे.

अशातच एक सर्व्हे पेपर मध्ये वाचायला मिळाला.देशातील उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्ये विषयी हा सर्व्हे आपण सुध्दा वाचला असाल.उच्च न्यायालयातील ५३७ न्यायाधिशांपैकी ७९% न्यायाधिश उच्च वर्गातील आहेत.अनुसुचीत जाती मधील केवळ २.८% न्यायाधिश उच्च न्यायालयात आहेत.अनु.जातीची हि संख्या अत्यल्प नव्हे नगण्य आहे.अशा परिस्थितीत सामाजिक न्याय कसा होणार आणी घटना कशी आपण वाचवणार.

भाजप हे आरएसएस चे अपत्य आहे हे आपल्याला माहीत आहेच.भाजपच्या या पितृत्व संंघटनेचे प्रमुख मोहन भागवत यांनी परवा ऑबर्झवर व पांचजन्य या मुखपत्रातून मुस्लींमाना एक सज्जड दम भरलाय.मुस्लीमांनी श्रेष्ठत्वाची भावना बाळगू नये.हिंदू गेली १००० वर्ष युद्ध लढताहेत हे सांगताना हिंदु आक्रमक झाले तर ती एक सामान्य गोष्ट आहे अस ते बोलले.मुस्लींमांनी घाबरण्याणी गरज नाही हे सांगताना त्यांनी जणू मुस्लीमांना हा देश फक्त हिंदूचा आहे हे सांगितलय.वास्तविक मुस्लीम श्रेष्ठत्वाची भावना बाळगतात याचा एक सुध्दा पुरावा त्यांनी दिलेला नाही.भागवतांच्या हिंदूच्या युध्दाबद्दलचे विधान आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  व्लादिमीर पुतीन यांना दिलेला सल्ला यामध्ये केवढी गफलत आहे बघा. Todays era is not of war अस मोदी बोलतात पण त्यांची पितृत्व संघटना मात्र हिंदू १००० वर्ष युध्द लढत आहेत हे सांगते.हा सगळा विरोधाभास आहे.म्हणून भाजप व rss जी धोरणं राबवत आहेत ती संशयास्पद आहेत.आज मुस्लीमांना टाचेखाली चिरडल जात असताना उद्या इतर अल्पसंख्याक समुदायाला का चिरडलं जाऊ शकणार नाही? बौध्द धर्मिय सुध्दा देशात अल्पसंख्याक आहेत हे विसरता कामा नये.आज ते भरडले जातील उद्या आपण भरडले जाऊ. पुढील कविता त्या दृष्टीने अत्यंत अर्थपुर्ण आहे.

First they came for the Socialists, and I did not speak out—
Because I was not a Socialist.

Then they came for the Trade Unionists, and I did not speak out—
Because I was not a Trade Unionist.

Then they came for the Jews, and I did not speak out—
Because I was not a Jew.

Then they came for me—and there was no one left to speak for me.

— Martin Niemöller

समाजाने संघटीत होण्याची कधी नव्हे ती गरज निर्माण झाली आहे.सामुहिक उद्देश्याच्या परिपुर्ततेसाठी वैयक्तीक स्वार्थ, मतभेद बाजूला ठेवायला हवेत.तुम्ही म्हणाल दिल्लीमध्ये घडणारं या राजकारणाशी माझाकाय संबध? मी काय करणार? होय आपण राज्यस्तर,देशस्तरावर कांहीं करणं जमणार नाही.पण आपण गल्ली मध्ये राहुन सुध्दा समाजोपयोगी काम करू शकतो.गल्लीमध्ये विकासकामे होत असतात या विकासकामांचा शुभारंभ करत असताना कंत्राटदार कामाची माहिती देणारा बोर्ड लावूनच काम सुरू करतो कि नाही हे पहाणं, आणी त्याला बोर्ड लावायला लावण हे सुद्धा एक समाजकार्य आहे.आपणास जागृत रहाव लागणार आहे.कारण आपल्याला पाण्याचा सुध्दा हक्क नव्हता, मंदिरात जाण्याने मंदिराला विटाळ व्हायचा.आपणास पशुवत वागणूक दिली जात होती.म्हणूनच आपल्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ परिपुर्णरित्या मिळाला पाहिजे.याकडे आपला कटाक्ष पहीजे.

मंडळी आपण आपल्या मुलांना शिकवतो, डॉक्टर, इंजिनिअर त्यांनी बनाव हे आपलं स्वप्न असतं पण आता गरज आहे वकिलांची.कायदा जाणणार्या तरूणांची.म्हणून आपल्या मुलांना वकीली करू द्या.आपल्याला जमत नसेल तर शेजारांच्या पोराला प्रोत्साहन द्ज्ञा. कारण आपला संबध समाज हे आपलं कुटुंब आहे.


संघम सरणंम गच्छामी ...

 



जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...