प्रगत शैक्षिणक महाराष्ट्र हा महाराष्ट्राला प्रगती पथावर नेणारा महत्वाकांक्षी प्रकल्प आता महाराष्ट्राच्या शाळांमधून सुरु झालेला आहे.महाराष्ट्राला देशपातळीवर प्राथम तीन क्रमांकावर आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणावयाचे आहे. विध्यार्थ्याला शिकवण्यापेक्षा त्याला शिकण्यात मदत करण्याची भूमिका गुरुजींनी करायची आहे. विद्यार्थी ज्ञानाचे रचियेते असतात ते ज्ञानाची निर्मिती करू शकतात हि एक अभिनव संकल्पना आहे. जेव्हा व्यक्ती स्वतः ज्ञान मिळवतो तेव्हा ते ज्ञान चिरकाल टिकणारे असते हि वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्याने ज्ञान मिळवन्यासाठी त्याला उद्युक्त करणे. त्याच्या विचारशक्तीला चालना देणे.त्याच्या मनातं उत्सुक्ता निर्माण करण्याचे काम गुरुजीचं आहे. म्हणजेच आता घोकमपट्टीला फाटा द्यायचा आहे. गुरुजी आता lecture देणार नाहीत ते आता facilitator होणार आहेत.विध्यार्थ्याला सारथी नकोय त्याला साथी हवाय हा दृष्टिकोण गुरुजींनी बाळगायचा आहे. facilitator हा शब्द म्हणूच अर्थपूर्ण वाटतो.
बालक नवीन काय तरी शिकतो तो कृतीतूनच.त्याच्या निसर्गदत्त भावनांना रोकायचं आणि त्याच्या डोक्यात कोंबायचं हि जुनाट पद्धती आपण फेकून देत आहोत.त्या ऐवजी त्याच्या सहज प्रवृत्ती प्रमाणे त्याला कृती प्रवण बनवायचं. त्यासाठी अनेक उपक्रम लाभदायक ठरतील.माझ्या शाळेत हळूहळू असे नवं नवीन उपक्रम राबवायला सुरु केलं आहे. पूर्वी देखील असे उपक्रम राबविले जात असायचे पण आता अधिक डोळस पणे असे उपक्रम राबविले जात आहेत.
अ) जयंत्या-
विद्या विनयेन शोभते असं म्हणतात . बालक हा मातीचा गोळा असतो . त्याला जसा आकार द्यावा तास तो होतो . या वयात त्याच्या समोर आदर्श व्यक्तीची उदाहरणे ठेवली तर तो देकील तश्या आदर्श विचारांनी युक्त होऊ शकतो . manners are not taught manners are caught. हे इंग्रंजी वाक्य असच अर्थपूर्ण आहे . तुम्ही असं वागा असे न म्हणता थोर माणसांनी असं वर्तन केलं होत हे आपण बालकावर ठसवू शकतो . थोरा मोठ्या माणसांच्या जयंती साजरी करणे हि बालकावर संस्कार करण्याची सुसंधी आहे असं मला वाटत . म्हणूनच माझ्या शाळेत थोर स्त्री पुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन आम्ही साजरे करतो.
ब )English Learning club-
प्रगती आणि इंग्लिश यांचं सख्य काय आहे हे सगळ्यांना माहित आहे . भारतासारख्या अनेक भाषा बोलणाऱ्या देशात आंग्ल भाषा लोकांना जोडण्याचं काम करते आहे . उच्च शिक्षण असो कि व्यापार असो इंग्रजी जाणणारा हा पुढे जातो हे वास्तव आहे . मराठीचा आदर करण्याबरोबर इंग्रजीचा पुरस्कार करण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे. इंग्रजीची भीती कमी व्हावी म्हुणुन मुलांना बोलायला उद्युक्त केलं जाते . बालकें त्यांच्या मित्रांच्या सोबत न घाबरता इंग्रजी बोलावेत म्हणून शाळेत इंग्लिश लेअर्निग क्लब सुरु केला आहे.
शाळेतील इतर उपक्रम बद्दल नंतर बोलूच पर्यंत नमस्कार