जय भिम
मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महामानवाचे प्रचंड मोठे योगदानआहे.त्यामुळेच बाबासाहेबांनप्रती आदर व्यक्त करण्यासाठी १४ एप्रील हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा असतो.हा दिवस दणक्यात साजरा करण्याकडे बहुतेक कार्यकर्त्यांचा कल असतो. वास्तवीक पाहता बाबासाहेबांना व्यक्तीपुजेचं स्तोम मान्य नव्हत.परंतु आपल्या सारख्या अनेकांना बाबासाहेब हे केवळ बाबासाहेब न वाटता ते आपले बाबा वाटतात… बाप वाटतात..म्हणूनच हा उत्साह..जर बाबासाहेब हे आपले बाबा असतील तर त्यांची मुलं म्हणून आपण त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालत राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ‘ शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा ‘ हा त्यांचा मुलमंत्र आपण खरच अंमलात आणतो का ? अशिक्षीतांनी शिकल पाहीजे, अर्धवटांनी अधीक समजदार व्हायला पाहीजे हेच त्यांच्या विचाराच सार.बाबासाहेब एकदा अस म्हणाले होते ‘ मुझे पढे लिखो ने फसाया है’ या त्यांच्या वाक्यातून त्याच्या मनातलं दुःख प्रकट होत आहे..अडाण्यांनी शिकायला पाहीजे आणी शिकणारांनी डोळस पणाने समाजाचे नैत्रुत्व करायला पाहीजे हाच मानस बाबासाहेबांचा होता..
आज समाजातील अशिक्षीत व शिक्षीत वर्ग यांच्यामध्ये एक प्रकारे तुटलेपण आलं आहे हे आपण पाहतो.सुधारलेल्या प्रत्येकाने समाजापासुन फारकत घेतली. त्यामुळे गावोगावी अर्धवटांची फौज तयार झाली. पुढे पुढे तर या फौजेने सुशिक्षीतांनी समाजाकडे लक्ष देणं म्हणजे आपल्यावरती गंडातर या नजरेने बघायला सुरुवात केली.सदसदविवेक बुध्दीचे काही सुशिक्षीत समाजाप्रती आपण काही देण लागतो हे मानतात सुध्दा पण समाजाप्रती काही करायच तर अर्धवटरावांची फौज त्यांच्यावर तुटून पडते.त्यामुळे अनेक सुशिक्षीत गप्प बसण पसंत करतात.
समाजात असा ही एक बेरकी वर्ग असतो तो समाजातील अर्धवटरावांना आपलंस करतो. अर्धवटांनी आयोजलेल्या कल्पनेला पाठींबा द्यायचा वाट्टेल तेवढा पैसा द्यायचा अशी तंत्र हा बेरकी वर्ग वापरतो. बेरकी वर्ग अशाप्रकारे बाासाहेंबाचा विचार संपवत असतो. बाबासाहेबांच्या विचारापासून अर्धवट वर्ग लांब कसा राहील हा त्यांचा प्रयत्न असतो.समाजात अजुन एक वर्ग असतो जो बांधावर असतो. ज्याला आपलं स्टेटस महत्वाचे वाटत असतो. पण त्याना समाजाप्रती आपण काय करायला पाहीजे हे लक्षात सुध्दा येत नाही.
आता परत मुळ मुद्द्याकडे येवूया..बाबासाहेबांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांची जयंती,त्यानी घालून दिलेल्या आदर्शांची जयंती होय. ही जयंती चर्चा, परीसंवाद, विचारमंथन या स्वरूपातच साजरी व्हायला हवी..या ऐवजी बाबासाहेबांच्या विचारापासुन कोसो दुर असलेली जयंती मला मान्य नाही..आपण नाचगाणी वैयक्तीक कार्यक्रमात करतोच की..पण जयंती ही बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रचार आणी प्रसारा करीता साजरी व्हायला पाहीजे अस माझ स्पष्ट मत आहे. बाबासाहेबांनी मला विचार स्वांतंत्र्य दिलय अभिव्यक्ती स्वांतत्र्य दिलय..त्यामुळे मी माझ्या परीने बाबासाहेबांच स्मरण करेन त्यांचे विचार अंमलात आणेन..
धन्यवाद