मंडळी जयभिम
आजच्या दिवशी ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी पाक्षिक 'मुकनायक'सुरू केले.शोषित,वंचीत, गलितगात्र झालेल्या दलितांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी पत्रकारिता सुरू केली होती.बाबासाहेबांचे द्रष्टेपण यात दिसून येते. Educate, organise,agitate हा मंत्र देणारे बाबासाहेब लेखणीचे महत्व ओळखून होते.एक महान समाजशास्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वचिंतक म्हणून ओळख असणाऱ्या बाबासाहेबांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला.मुकनायकचे ब्रिदवाक्य म्हणून त्यांनी संत तुकारामाच्या अभंगातील पुढील ओळी निवडल्या.
काय करू आता धरूनिया भीड।
नि:शक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण।
सार्थक लाजून नव्हे हीत ।।
आता भिड बाळगुन काय उपयोग नाही. लाजुन काय उपयोग नाही.समाजाचे दैन्य, दुःख आता मांडायलाच पाहीजे.अवनतीला पोहचलेल्या समाजाच्या उत्थानासाठी आता टाहो फोडलाच पाहीजे अस या ओळी सांगतात.तुकारामांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.त्यामुळे तुकाराम सुध्दा आपलेच.मात्र ब्राम्हणी व्यवस्थेला तुकाराम धोकादायक वाटत असतील त्यामुळे काही क्षुद्र महाराज तुकारामांच्या वर अश्लाघ्य टिका करतात.त्यांचा निषेध करेल तेवढा थोडाच.
मुकनायक,बहिष्कृत भारत आणि प्रचंड ग्रंथसंपदा या मधुन बाबासाहेबांनी गुलाम झालेल्या समाजाच्या पायातील शृंखला तोडण्याचे काम केले.पुढे बाबासाहेब उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले.तेंव्हा मुकनायकचे व्यवस्थापनाचे काम ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्यावर येऊन पडले.खर तर बाबासाहेबांनीच त्यांच्यावर हि जबाबदारी सोपवली होती.ज्ञानदेव घोलप यांनी हि जबाबदारी समर्थपणे पेलली.ते सरुडचे होते हे सर्वज्ञात आहे.आपल्या ग्रुपचे सदस्य आयु.संकेत घोलप यांचे ते पणजोबा होते.सरुडकरांना अभिमान वाटेल अशी हि गोष्ट.
चला मुकनायकच्या स्थापनेच्या वर्धापनदिनी आपण संकल्प सोडूया की आमची दुःख,आमच्या समस्या सोडवण्यासाठी आपण आता टाहो फोडणार.समाजाकडे दुर्लक्ष करणारे आणि अन्याय करणार्यांना आपण वठणीवर आणणार. कारण बाबासाहेबांनींच सांगितले होते 'अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो'.
(वाचुन थंड बसू नका..समाजाला आपल्या कडून काय योगदान मिळेल याचा विचार करा)
संघम सरणंम गच्छामी
(हेमंत आकाराम तेलवेकर)