बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

सार्वकालीन गांधीजी

काल शाळेत महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.सकाळी मुले मोठ्या उत्साहाने शाळेत जमली होती.संयोजकांनी पण छान तयारी केली होती.एका मोठ्या टेबलवर गांधीजी आणी शास्त्रींची प्रतीमा ठेवण्यात आली होती.प्रतीमेपुढे फुले,आरती,अगरबत्ती वगैरे होत.सत्रसंचलन सुतार सर करत होते.प्रतीमापुजन झाल्यावर त्यांनी मला प्रास्ताविकासाठी निमंत्रित केलं.गांधीजींच्या व शास्त्रीजींच्या कार्याचा आढावा घेऊन मी प्रास्ताविक संपवलं.मग शाळेतील मुलींनी मनोगत व्यक्त केलं.शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख जंगम सराचं भाषण झालं.आपल्या भाषणात त्यांनी व्यसनमुक्ती बद्दल गांधीजीचे विचार सांगितले,व पुढे म्हणाले की आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात थोडी त्रुटी राहीली आहे.मुख्याध्यापक म्हणून सरांचं मार्गदर्शन पर भाषण शेवटी ठेवायच्या ऐवजी त्यांना प्रास्ताविक करायला लावल,त्याबद्दल दिलीगिरी.अर्थात माझ्या हे डोक्यात नव्हत.शिवाय मार्गदर्शन करण्याइतपत मी स्वतः ला एवढा मोठा पण समजत नाही.पण त्याक्षणी गांधीजीच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग मला आठवला.जंगम सरांच भाषण आटोपल्यावर मी सरांच्याकडून माईक घेतला आणी तो प्रसंग सांगीतला.
१९३३-३४ ची गोष्ट Marylebone cricket club(MCC) भारतात क्रिकेट खेळायला आला होता.डग्लस जार्डिन त्यांचा कप्तान होता.भारता कडून फलंदाजीची सुरवात विजय मर्चंट करणार होते.विजय मर्चंट यांची बहीण क्रिकेट ची चांगलीच फँन होती.सामना अहमदाबादला खेळवला जाणार होता.आणी शहरात गांधीजी पण होते.विजय मर्चंट यांची बहीण गांधीजीना भेटायला गेल्या. ऑटोग्राफ साठी त्यांनी गांधीजीना आग्रह केला.गांधीजीनी वही हातात घेतली.एका पानावर त्यांना MCC च्या खेळाडूंंचे ऑटोग्राफस दिसले.एकदंरीत सोळा खेळांडुंच्या सह्या होत्या.गांधीजीनी पेन हातात घेतलं आणी १६ च्या खाली १७ वा नंबर टाकला.पुढे MK GANDHI अस लिहलं व सही केली.गांधीजींची ही कृती किती साधेपणाची आणी नम्र पणाची आहे.मी आपल्या पैकीच एक आहे आणी वेगळा कोणी नाही हे दर्शवण्याचा तो एक छोटासा प्रयत्न.इग्रंज सरकार विरूध्द माझा लढा असला तरी सर्व सामान्य इंग्रजी माणसाच्या विरूध्द मी नाही हे गांधीजींचे सांगणे होते.या घटनेचा उल्लेख 'POLITICAL HUMAR' या पुस्तकामध्ये आला आहे.जुडसन कॉर्नली त्याचे लेखक आहेत.
                 गांधीजीच्या या कृतीचा उल्लेख करून मी पुढे म्हणालो की गांधीजीच्या जयंती दिना निमीत्त गांधीजीचा नम्रपणा आपण स्विकारायला पाहीजे.गांधीजीच्या विचाराची अमंलबजावणी न करता त्यांच्या तत्वज्ञानावर केवळ विद्वत्ता प्रचूर भाषणं देण सर्वस्वी चुक राहील.आणी म्हणून प्रास्ताविक कोणी केलं या पेक्षा गांधीजींच्या विचाराचा जागर होणं महत्वाचं.

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...