गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३

भापुवि

मंडळी,

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणार्या कोल्हापुर जिल्ह्यातील स्थळांची यादी व त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षातील झालेली विकास कामे या बद्दल RTIact अन्वये मी भारतीय पुरातत्व विभागाकडे माहिती मागवली होती.या अर्जाला उत्तर देताना भापुवि ने म्हटलय की त्यांच्या अखत्यारीत पुढील स्थळे येतात
१ पन्हाळा किल्ला
२ पोहाळे गुहा
३ ब्रम्हपुरी (कोल्हापूर)
४ खिद्रापूर

याचाच अर्थ केवळ हि चारच स्थळे त्यांच्याकडे आहेत का की अजून काही ऐतिहासिक स्थळांचा उल्लेख करणं त्यांच्याकडून राहून गेलय हे कळायला मार्ग नाही..

विकास कामांच्या मुद्यांच्या बाबतीत त्यांनी म्हटलय की, G20 च्या भारतामध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनाच्या कामात स्टाफ व्यस्त असल्यामुळे संबधीत माहिती तात्काळ देऊ शकत नाही.भारत या वर्षी G20 चे अध्यक्षपद भुषवत आहे.संपुर्ण भारतात G20 समीटचे वातावरण उत्साहवर्धक आहे.मात्र मला हे कळत नाही की हि समिट होणार आहे संप्टेबंर महिन्यात दिल्लीमध्ये.मात्र मुबंईतील कार्यालयावर याचा भार कसा काय? मी समजू शकतो कार्यबाहुल्यामुळे संबधीत कार्यालय तात्काळ माहिती देऊ शकत नसेल सुध्दा पण भारत विश्वगुरु बनण्याच्या स्वप्नानी झपाटला असताना विवीध सरकारी कार्यालयांनी कामांच्या उरकाच्या बाबतीत झपाटा दाखवला तर भारत विश्वगुरू बनण्याच्या बाबतीमध्ये अजून एक पाऊल पुढे जाईल.

प्रश्न असा पडतो की संबधीत कार्यालय जाणिवपूर्वक तरी हे काम पुढे ढकलत नसेल ना?.गेल्या पाच दहा वर्षा मध्ये ऐतिहासिक,धार्मिक आणी सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कोल्हापूरातील महत्वाच्या स्थळांच्या बाबतीत भापुवि ने पुरेसे लक्ष दिलय का? विकासकामांवर खर्च केलाय काय?  हा सध्या तरी अनुत्तरित असणारा प्रश्न आहे.आपल्याकडे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असणार्या स्थळांच्या बाबतीत सार्वजनिक व सरकारी स्तरावरती देखील अनास्था आढळते.व ही महत्त्वाची स्थळे दुर्लक्षित राहतात.मग कुठली तरी संघटना आंदोलन वगैरे करते मग सरकार जागे होतं अशी परिस्थिती आहे.चला आशा करूया पुढच्या काळात हि परिस्थिती बदलेल.....

जयंती

 जय भिम  मंडळी बाबासाहेबांची जयंती उत्सव जवळ येत आहे तसे भिम सैनिकांचा उत्साह वाढत आहे. मानवमुक्तीच्या महालढ्यामध्ये बाबासाहेबां सारख्या महा...